---Advertisement---

विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, अनुष्कानं गोंडस मुलाला दिला जन्म, अन् नावही केलं जाहीर

Virat Kohli and Anushka Sharma with daughter Vamika
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याघरी बाळाचं आगमन झालं आहे. अनुष्कानं १५ फेब्रुवारीला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. पण अनुष्कानं आत्ता काही वेळापूर्वी स्वतः इन्स्टा पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना सांगितली आहे. 

https://www.instagram.com/p/C3kvKa5Nr6m/?utm_source=ig_web_copy_link

याबरोबरच विराटने इन्स्टा पोस्ट शेअर करत म्हंटले आहे की,  “मोठ्या प्रेमानं आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी चिमुकलं बाळ ‘अकाय’चं अर्थात विमिकाच्या छोट्या भावाचं आम्ही या जगात स्वागत केलं. आमच्या जीवनातील या सुंदर काळासाठी आम्हाला तुमच्या सदिच्छांची अपेक्षा आहे. यावेळी आमच्या प्रायव्हसीचा तुम्ही आदर करावा, हीच माझी तुमच्याकडं विनंती.”

तसेच हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’ असा होतो. ज्याला कोणतंही स्वरुप, देह व आकार नाही असा निराकार. याशिवाय तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र (shining moon) असा होतो.

दरम्यान, अनुष्कानं आपल्या बाळाचं नावही जाहीर केलं असून ‘अकाय’ असं नाव आहे. अनुष्कानं मुद्दाम हिंदी देवनागरीत हे नाव आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. विराट आणि अनुष्काला विमिका नावाची एक मुलगीही आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---