यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 25 वा सामना भारत विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला जात आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं (Virat Kohli) मैदानात उतरताच इतिहास रचला. विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील सर्व क्रिकेट दिग्गजांपैकी एक आहे. कोहली नेहमीच त्याच्या विराट कामगिरीमुळं चर्चेत असतो.
विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत एँट्री केली आहे. त्यासोबतच तो सर्वाधिक 525 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील 7वा खेळाडू ठरला. कोहलीनं शाहिद आफ्रिदीला मागे टाकत इतिहास रचला. तसंच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे. कोहलीनं 113 कसोटी, 292 एकदिवसीय, 120 टी20 सामने खेळले आहेत.
विराट कोहलीनं 2008 साली आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये वर्चस्व गाजवलं आहे. कोहलीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 80 शतक ठोकले आहेत. कोहली आंतरराष्ट्रीय सामन्यात 80 शतक ठोकणारा जगातील दुसरा खेळाडू आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीनं 113 सामन्यात 8,848 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या 254 नाबाद राहिली आहे. तर 292 एकदिवसीय सामन्यात त्यानं 13,848 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान तो एकदिवसीय सामन्यात 50 शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. 120 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कोहलीनं भारतासाठी सर्वाधिक 4,042 धावा ठोकल्या आहेत.
विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वाधिक आंतराष्ट्रीय सामने खेळण्याच्या यादीत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद (Shahid Afridi) आफ्रिदीला मागे टाकलं. कोहली आता अजून एक विक्रम रचू शकतो, भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. तर कोहली हा 525, त्यामुळे तो पुढच्या काही सामन्यात धोनीच्या विक्रमाला मागे टाकून पुन्हा नवा इतिहास रचू शकतो.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे दिग्गज खेळाडू:
664 – सचिन तेंडुलकर
652 – माहेला जयवर्धने
594 – कुमारा संगकारा
586 – सनथ जयसूर्या
560 – रिकी पाँटिंग
538 – महेंद्रसिंह धोनी
525- विराट कोहली*
524 – शाहिद आफ्रिदी
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझमने आयसीसी टी20 क्रमवारीत घेतले झेप, संघाची कामगिरी मात्र खराबच
भारतानं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लाख-कोटी नाही, सीएसकेची ब्रँड व्हॅल्यू अब्जावधीत आहे; रक्कम जाणून तुम्ही पण व्हाल थक्क!