मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने आले आहेत. या मैदानावर उभय संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरू आहे. हा सामना जिंकत मालिकाही खिशात घालण्याची दोन्ही संघांकडे संधी आहे. या सामन्यातून भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याचे संघात पुनरागमन झाले आहे. परंतु तो पुनरागमनात विशेष खेळी करू शकला नाही. या सामन्यात विराट खातेही न खोलता तंबूत परतला. यासह त्याच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी निवडलेल्या भारतीय संघाला ८० धावांवर पहिला धक्का बसला. न्यूझीलंडचा फिरकीरटू अजाज पटेलने शुबमन गिलला ४४ धावांवर झेलबाद करत भारताची सलामी जोडी तोडली. त्यानंतर अजाननेच चेतेश्वर पुजाराच्या रुपात भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का दिला. पुजारा केवळ ० शून्यावर त्रिफळाचीत झाला. ८० धावांवर २ मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर संघाला कोहलीकडून कर्णधार खेळीची आस होती. परंतु तोही वेळ मैदानावर टिकू शकला नाही.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोहलीला २९.६ षटकात अजाननेच पायचित केले. यावर कोहलीने लगेचच रिव्ह्यू घेतला. यावेळी चेंडू त्याच्या पायाला आधी लागला की बॅटला, हे समजत नव्हते. तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यामुळे विराटला शून्यावर माघारी परतावे लागले.
कर्णधार म्हणून कोणता कसोटी सामना खेळताना विराटने शून्यावर बाद होण्याची ही दहावी वेळ होती. तसेच विराटने यापूर्वी कर्णधार म्हणूनही कसोटीत १० शतके केली आहेत. त्यामुळे विराट हा कसोटीत १० शतके करणारा आणि १० वेळा शून्यावर बाद होणारा भारतातील पहिला आणि जगातील केवळ दुसरा कर्णधार ठरला आहे. त्याच्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्या नावावर या अनोख्या विक्रमाची नोंद होती.
विराटआधी हा विक्रम करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्मिथ यांनी कसोटीत ११७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून तब्बल २७ शतके आणि ३८ अर्धशतके निघाली आहेत. याबरोबरच त्यांनी ५ द्विशतकेही केली आहेत. त्यांच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये ९२६५ धावांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाद की नाबाद? विराटच्या विकेटने उडवला गोंधळ, पाहा व्हिडिओ
शरद पवारांसह रूपाली चाकणकरांनी लुटला मुंबई कसोटीचा आनंद; फेसबुक पोस्ट होतेय व्हायरल
मायदेशात तळपे मयंक अग्रवालची बॅट; एक-दोन नव्हे कसोटीतील सगळीच शतके ठोकलीये भारतात, आजही…