आयपीएल 2023 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ भिडले. मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने एकतर्फी वर्चस्व गाजवले. तुफानी फलंदाजीनंतर धारदार गोलंदाजीसह उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 24 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दोन वर्षानंतर या सामन्यात विराट कोहली याने आयपीएलमध्ये नेतृत्व केले. यासोबतच विराटच्या नावे टी20 इतिहासातील एक मोठा विक्रम जमा झाला.
फाफ डू प्लेसिस दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात विराट कर्णधार म्हणून खेळला. तर, प्लेसिसने केवळ फलंदाजी करत विजयकुमार याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात पाठवले. विराट व प्लेसिस या जोडीने संघाला 137 धावांची सलामी दिली. विराटने स्वतः कर्णधाराला साजेशी खेळी करत 47 चेंडूवर 59 धावा केल्या. यामध्ये पाच चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
या खेळीदरम्यान विराटने टी20 क्रिकेटमधील एक मोठा पराक्रम आपल्या नावे केला. विराटने टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने 6500 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला. विराटने 186 डावांमध्ये ही कामगिरी करून केली. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी असून, त्याने 6176 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माच्या नावे 5489 धावा आहेत.
विराटने 2021मध्ये सोडलेले कर्णधारपद
विराट कोहली याने अखेरच्या वेळी 11 ऑक्टोबर, 2021 रोजी आरसीबी संघाचे नेतृत्व केले होते. यानंतर त्याने आता 556 दिवसांनंतर कर्णधारपद भूषवले. विराट कोहलीने 141 सामन्यात नेतृत्व करताना 65 सामन्यात विजय मिळवले आहेत. तर 69 सामन्यात त्यांना पराभव पत्करावे लागले. तसेच, 3 सामने बरोबरीत सुटले व 4 सामन्यांचा निकाल लागला नाही.
(Virat Kohli Become First Captain In T20 Cricket Who Scored 6500 Runs Dhoni Rohit Second Third)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या नेतृत्वात आरसीबी विजयी मार्गावर! पंजाबवर नोंदवला 24 धावांनी दणदणीत विजय
दिनेश कार्तिक पुन्हा निशाण्यावर, शेवटच्या 10 षटकांमध्ये पंजाब किंग्जच्या गोलंदाजांकडून जबरदस्त कमबॅक