पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार्लमधील बोलंड पार्क स्टेडियममध्ये शुक्रवारी (२१ जानेवारी) झाला. हा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासाठी एका कारणाने विशेष ठरला आहे. मात्र, असे असतानाही तो शून्यावर बाद झाल्याने त्याची सामन्यात निराशा झाली आहे.
विराटचा विक्रम
शुक्रवारी झालेला सामना विराटचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४५० वा सामना होता. तो हा कारनामा करणारा जगातील १८ वा खेळाडू ठरला आहे. तसेच ४५० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा पार करणारा तो भारताचा चौथाच खेळाडू ठरला आहे. विराटपूर्वी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला आहे. या तिघांनीही ५०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे सचिनच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विश्वविक्रम देखील आहे. त्याने ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४५० सामने खेळताना ५४.८२ च्या सरासरीने ७० शतके आणि १२० अर्धशतकांसह २३४०९ धावा केल्या आहेत.
अधिक वाचा – विराटने राजीनामा देत फसवला बीसीसीआयचा प्लॅन? धक्कादायक योजनेचा झाला खुलासा
विराटची निराशाजनक कामगिरी
विराटसाठी शुक्रवारचा सामना फलंदाजीसाठी मात्र निराशाजनक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराटला केशव महाराजने बाद केले. फिरकीपटू महाराजच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमाच्या हाती झेल देऊन विराट शून्यावर बाद झाला. विराटसाठी फिरकीपटूविरुद्ध वनडेत शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती.
हा सामना भारतासाठी महत्त्वाचा सामना होता, कारण ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती.
व्हिडिओ पाहा – विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे क्रिकेटपटू
६६४ – सचिन तेंडुलकर
६५२ – माहेला जयवर्धने
५९४ – कुमार संगकारा
५८६ – सनथ जयसूर्या
५६० – रिकी पाँटिंग
५३८ – एमएस धोनी
५२४ – शाहिद आफ्रिदी
५१९ – जॅक कॅलिस
५०९ – राहुल द्रविड
४९९ – इंझमाम-उल हक
४९७ – तिलत्करने दिलशान
४९५ – मुथय्या मुरलीधरन
४९३ – स्टीव्ह वॉ
४८३ – ख्रिस गेल
४६७ – मार्क बाऊचर
४६० – वासिम आक्रम
४५४ – शिवनारायण चंद्रपॉल
४५० – विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! बिहार पोलिसांनी सचिनचा चाहता ‘सुधीर कुमार’ला चोपलं, वाचा सविस्तर
भारताच्या अंडर-१९ संघातील ५ खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे ‘या’ पठ्ठ्यांची लॉटरी, जाणार वेस्ट इंडिजला
धोनीचा रोल मिळावा म्हणून सुशांत सिंग रजपूतने घेतली होती केवळ एवढी रक्कम