ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश (INDvBAN) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संथ सुरुवातीनंतर भारतीय संघाने केएल राहुल, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या शानदार खेळाच्या जोरावर बांगलादेश समोर विजयासाठी 185 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करताना विराट कोहली याने टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला. (Virat Kohli Becomes Highest Run Scorer In T20 World Cup)
The greatest in #T20WorldCup history 🔥
Virat Kohli breaks yet another record 👇https://t.co/hpbECiH3xq
— ICC (@ICC) November 2, 2022
ऍडलेड येथे झालेल्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा झाल्यानंतर विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात केली. स्पर्धेत यापूर्वीच दोन अर्धशतके ठोकलेल्या विराटने या सामन्यातही तसाच आक्रमक अंदाज दाखवला. एकेरी दुहेरी धावांच्या सोबतच खराब चेंडूंचा समाचार घेत चौकार-षटकार वसूल केले. अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने 44 चेंडूवर 8 चौकार व एका षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.
विराटने या सामन्यात 16 धावांचा टप्पा पार करताच टी20 विश्वचषक इतिहासात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज त्याचा मान मिळवला. त्याने श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने याला मागे सोडले. त्याच्या नावे टी20 विश्वचषकात 31 डावात 1016 धावा जमा होत्या. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल 965 धावांसह उभा आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने देखील आत्तापर्यंत टी20 विश्वचषकात 37 सामन्यात 921 धावा केल्या आहेत.
विराटच्या आकडेवारीचा विचार केला गेल्यास त्याने 2012 पासून आजवर पाचवा टी20 विश्वचषक खेळताना 25 सामन्यांच्या 23 डावात 88.75 च्या शानदार सरासरीने 1065 धावा केल्या आहेत. यामध्ये तब्बल 13 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच विराटला दोन वेळा टी20 विश्वचषकात सर्वोत्तम खेळाडू म्हणून देखील पुरस्कार मिळालेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका चेंडूने बनवले व्हिलन एकाने हिरो! जीवदान मिळाल्यावर दोन चेंडूच टिकू शकला रोहित
बांगलादेश बनला टॉसचा बॉस! टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रण; संघात महत्त्वपूर्ण बदल