वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिलाच उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी दमदार सुरुवातीला नंतर विराट कोहली याने देखील अप्रतिम फलंदाजी केली. आपल्या शानदार खेळी दरम्यान 80 वी धाव घेताना त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
Virat Kohli reaches another milestone as he breaks Sachin Tendulkar's 2003 World Cup record for the most runs in a single World Cup edition.
Tendulkar- 673 runs (11 innings) in 2003 World Cup
Kohli- 674* (10 innings) in 2023 World Cup#CWC2023 #INDvsNZ #WorldCupOnDD pic.twitter.com/JWMFJN3vH0
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 15, 2023
एका वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटने यावेळी आपल्या नावे केला. त्याने सचिन तेंडुलकर याने 2003 मध्ये केलेला 673 धावांचा विक्रम मोडीत काढला. आता या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन 659 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2007 विश्वचषकात ही कामगिरी केली होती.
(Virat Kohli Becomes Most Successful Batter In ODI World Cup Edition He Breaks Sachin Tendulkar Record)
हेही वाचा-
India vs New Zealand: भारताने जिंकला Toss, सेमीफायनल जिंकण्यासाठी रोहित उतरवणार ‘या’ 11 खेळाडूंना मैदानात
IND vs NZ Pitch Controversy: सेमीफायनलपूर्वी मोठा वाद, BCCIवर खेळपट्टी बदलण्याचा आरोप; लगेच वाचा