---Advertisement---

३२वी धाव घेताच कर्णधार कोहली ठरला असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय!

---Advertisement---

कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात विराटने 32 वी धाव घेताच कसोटी कर्णधार म्हणून 5000 धावाही पूर्ण केल्या आहेत. कसोटीत कर्णधार म्हणून 5000 धावांचा (5000 Test Runs as a Captain) टप्पा पार करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच जगातील एकूण 6 वा कर्णधार ठरला आहे.

याआधी ग्रॅमी स्मिथ(Graeme Smith), ऍलेन बॉर्डर(Allan Border), रिकी पॉटिंग(Ricky Ponting), क्लाइव्ह लॉईड(Clive Llyod) आणि स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी हा पराक्रम केला आहे.

याबरोबरच विराटने कर्णधार म्हणून 86 व्या कसोटी डावात खेळताना 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो कसोटीमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार पॉटिंगला मागे टाकले आहे. पॉटिंगने 97 डावात कर्णधार म्हणून 5000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.

आजपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश संघातील कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपूष्टात आला आहे. तसेच भारताने पहिल्या डावात 30 षटकांच्या आतच 110 धावांचा टप्पा पार केला असून सध्या विराटसह चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत आहे. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.

#कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

8659 धावा – ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका)

6623 धावा – ऍलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)

6542 धावा – रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया)

5233 धावा – क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज)

5156 धावा – स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड)

5000 धावा – विराट कोहली* (भारत)

#कसोटीमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारे कर्णधार –

86 डाव – विराट कोहली

97 डाव – रिकी पॉटिंग

106 डाव – क्लाइव्ह लॉईड

110 डाव – ग्रॅमी स्मिथ

116 डाव  – ऍलेन बॉर्डर

130 डाव – स्टिफन फ्लेमिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---