---Advertisement---

‘कॅप्टनकूल’ धोनीला मागे टाकत कर्णधार कोहली बनला असे करणारा पहिलाच भारतीय!

---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघातील पहिल्या कसोटी सामन्यात(1st Test) आज(16 नोव्हेंबर) भारताने तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडीही घेतली आहे.

त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या(Virat Kohli) नावावर एक विक्रम झाला आहे. तो कसोटीमध्ये एका डावाने सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

आज बांगलादेश विरुद्ध मिळवलेला विजय हा विराटचा कर्णधार म्हणून हा कसोटीमधील एका डावाने मिळवलेला 10 वा विजय आहे.

त्यामुळे त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला(MS Dhoni) मागे टाकले आहे. धोनीने 9 कसोटी सामने कर्णधार म्हणून एका डावाने जिंकले आहेत.

सर्वाधिक कसोटी सामन्यात एका डावाने विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत आता विराट धोनीला मागे टाकत अव्वल क्रमांकावर आला आहे.

तसेच या यादीत विराट आणि धोनी पाठोपाठ माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन(Mohammad Azharuddin) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 8 वेळा कर्णधार म्हणून कसोटीमध्ये एका डावाने विजय मिळवले आहेत.

सर्वाधिक कसोटी सामन्यात एका डावाने विजय मिळवणारे भारतीय कर्णधार – 

10 – विराट कोहली 

9 – एमएस धोनी

8 – मोहम्मद अझरुद्दीन

7 – सौरव गांगुली

2 – पॉली उम्रीगर, कपिल देव, राहुल द्रविड

https://twitter.com/Maha_Sports/status/1195631144286294017

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---