ऍडलेड। भारताचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक केले आहे.
हे शतक त्याने 108 चेंडूत पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 39 वे तर एकूण 64 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये वन-डेत शतक करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याबरोबरच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत कुमार संगकाराच्या 63 शतकांना मागे टाकले आहे.
याआधी भारताकडून वन-डे संघाचे नेतृत्व करताना कोणत्याच खेळाडूला ऑस्ट्रेलियामध्ये शतक करता आले नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनी 1992मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 93 धावा केल्या होत्या. तर सचिन तेंडुलकरने 2000मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताचे नेतृत्व करताना 93 धावा केल्या होत्या.
तो या सामन्यात शिखर धवन बाद झाल्यानंतर 8 व्या षटकात फलंदाजीला आला होता. त्यानंतर त्याने रोहित शर्माबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर अंबाती रायडूबरोबरही 59 धावांची भागीदारी केली आहे. पण रायडूही खेळपट्टीवर स्थिरावल्यावर बाद झाला आहे.
पण त्याचा विराटच्या फलंदाजीवर फरक पडला नाही. त्याने एमएस धोनीबरोबरही चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली आहे.
Virat Kohli becomes the first Indian captain to score an ODI century in Australia.
Previous highest ODI score by an Indian captain in Australia:
93 – Mohammad Azharuddin vs AUS in 1992
93 – Sachin Tendulkar vs PAK in 2000#AUSvIND— Sampath Bandarupalli (@SampathStats) January 15, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–कर्णधार कोहलीचे दुसऱ्या वनडेत शानदार शतक!
–विराट एक्सप्रेस सुसाट, संगकाराचा विक्रमही मोडला
–ना सौरव, ना धोनी; परदेशात कोहलीच आहे किंग