ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसर्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला मंगळवारी (८ डिसेंबर) १२ धावांनी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ६१ चेंडूत ८५ धावांची दमदार खेळी केली. याच अर्धशतकासह त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे केले.
विराट कोहलीचे आजचे अर्धशतक त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतले पंचविसावे अर्धशतक ठरले. यासह आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचला.
रोहित शर्माचेही आहेत २५ अर्धशतके
आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विक्रम यापूर्वी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याच्या नावावर होता. रोहितने १०८ आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत ३२.६२ च्या सरासरीने २७७३ धावा आणि २५ अर्धशतक झळकाविले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर १९ अर्धशतकांसह तिसर्या स्थानावर आहे. तर आर्यलंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंग १८ अर्धशतकांसह चौथ्या स्थानी आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत सर्वाधिक अर्धशतके ठोकणारे फलंदाज-
१) विराट कोहली – २५
२) रोहित शर्मा – २५
३) डेविड वॉर्नर – १९
४) पॉल स्टर्लिंग – १८
कोहलीच्या चिवट झुंजीनंतरही भारताच्या पदरी पराभव
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रलियाने दिलेल्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ७ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले. कर्णधार विराट कोहलीने ६१ चेंडूत खेळलेल्या ८५ धावांची खेळी भारताला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. इतर फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेल्याने भारताचा डाव सावरुच शकला नाही.
संबधित बातम्या:
– एकटा विराट पडतो ऑस्ट्रेलियावर भारी! पहा कांगारूंविरुद्धची भारतीय कर्णधाराची आकडेवारी
– INDvsAUS: स्वेप्सनने वाचवला ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप, तिसऱ्या टी२० सामन्यात भारत १२ धावांनी पराभूत
– ब्रेकिंग: आयसीसी टी२० क्रमवारी जाहीर, पाहा टीम इंडिया आहे कोणत्या स्थानावर