मंगळवारी (३ जूलै) भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी२० सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार कोहलीने नाबाद ३२ धावांची खेळी खेळली.
२२ चेंडूत नाबाद २० धावा करताना त्याने १ षटकार खेचला. याबरोबर त्याच्या नावावर काही खास विक्रम झाले.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये वेगवान २००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने ६० सामन्यात ४९.०७च्या सरासरीने २०१२ धावा केल्या आहेत. काल त्याला हा विक्रम करण्यासाठी केवळ ८ धावांची गरज होती.
याबरोबर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २००० धावा करणारा तो केवळ चौथा फलंदाज ठरला आहे. यापुर्वी मार्टिन गप्टील(२२७१), ब्रेंडन मॅक्क्युलम(२१४०) आणि शोएब मलिकने (२०३९) हा कारनामा केला आहे.
विराटने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये जलद १०००धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे यापुर्वी केला आहे तर १५०० धावा करण्याचा विक्रम संयुक्तपणे त्याच्या आणि अॅराॅन फिंचच्या नावावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये जलद ५०० धावा करण्याचा विक्रम मात्र भारताच्याच केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने १३ डावात हा पराक्रम केला होता.
टी२०मध्ये जलद धावा करणारे खेळाडू
५०० धावा- केएल राहुल- १३ डाव
१०००- धावा- विराट कोहली- २७ डाव
१५०० धावा- अॅराॅन फिंच / विराट कोहली- ३९ डाव
२००० धावा- विराट कोहली- ५६ डाव
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने…
-अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रचला विश्वविक्रम
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आज झाली विश्वविक्रमी भागिदारी
-सौरव गांगुलीपाठोपाठ आता गंभीरही करणार या क्रिकेट बोर्डात बाॅसगिरी!