---Advertisement---

कॅच घेतल्यानंतर केला बिहू डान्स, विराट कोहलीचं अनोखं सेलिब्रेशन तुफान व्हायरल

---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम येथे होतो आहे. या सामन्यात यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहलीनं एक अनोखा डान्स केला. त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा डान्स भारताचा युवा फलंदाज रियान परागचा ट्रेडमार्क आहे.

अक्षर पटेलनं भारतीय डावातील 27वं षटक टाकलं. या षटकातील चौथ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमानं शॉट खेळला, पण चेंडू त्याच्या बॅटला नीट लागला नाही. चेंडू कव्हरच्या दिशेनं हवेत गेला आणि विराट कोहलीनं सोपा झेल घेतला. झेल घेतल्यानंतर कोहली खूप आनंदी दिसला आणि त्यानं अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. विराट कोहलीनं डगआउटमध्ये बसलेल्या रियान परागकडे बघत बिहू डान्स केला. तुम्ही त्याचा हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

समरविक्रमानं 31 चेंडूत 14 धावा केल्या, ज्यात केवळ एका चौकाराचा समावेश होता. मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याची बॅट शांत होती. त्याला केवळ 8 धावाच करता आल्या. या सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 240 धावा केल्या. श्रीलंकेचा एकही फलंदाज 50 धावांचा आकडा गाठू शकला नाही. अविष्का फर्नांडो आणि कामिंडू मेंडिस यांनी सर्वाधिक 40-40 धावा केल्या. तर ड्युनिथ वेलालागेनं 39 धावांचं योगदान दिलं.

भारताकडून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरनं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 10 षटकांत फक्त 30 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादवनं 2 बळी घेतले. त्यानं आपल्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये 33 धावा दिल्या. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता.

हेही वाचा – 

IND vs SL पहिल्या चेंडूवर विकेट घेवून मोहम्मह सिराजनं रचला इतिहास..!
महिला प्रीमियर लीगमध्ये होणार सीएसकेची एंट्री? लवकरच घेतला जाईल मोठा निर्णय
सरफराज खानकडे मुंबई क्रिकेट संघाचं नेतृत्व, एमसीएनं दिली मोठी जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---