विराट कोहली. भारतीय क्रिकेट संघाच्या या खेळाडूचे नाव घेताच धडाकेबाज फलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट नेतृत्त्व करणारा व्यक्ती सर्वांच्या डोळ्यांपुढे उभा राहतो. परंतु हाच कोहली गोलंदाजी करताना दिसणे, असे फार क्वचितच होते. कोहली सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या ताफ्यासह इंग्लंडमध्ये सराव करण्यात व्यस्त आहे. १८ जूनपासून त्यांना न्यूझीलंडविरुद्ध साउथम्पटनमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळायचा आहे.
या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू दोन संघ बनवून अंतर्गत सामना खेळत आहेत. या सामन्यादरम्यान ३२ वर्षीय कोहली फलंदाजीबरोबर गोलंदाजी करतानाही दिसला. त्याचा गोलंदाजी करताना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल फलंदाजी करताना दिसत आहे. तर कोहली हातात चेंडू घेऊन अतिशय उत्साहाने त्याला गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याने टाकलेल्या चेंडूवर राहुल थोडक्यात पायचित होण्यापासून वाचला असल्याचे दिसत आहे. कसाबसा चेंडू अडवून राहुलने स्वत:चा बचाव केला आहे.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी कोहलीला गोलंदाजी करताना पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. अनेकांनी तो येत्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात गोलंदाजी तर करणार नाही का असे प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु तो खरोखरच गोलंदाजी करणार आहे की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.
How many of you guessed it right?#TeamIndia pic.twitter.com/7uXkaYaZ3g
— BCCI (@BCCI) June 12, 2021
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताचा प्रतिस्पर्धी असलेला न्यूझीलंड संघ मागील काही दिवसांपासून इंग्लंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेद्वारे त्यांना इंग्लंडच्या खेळपट्टींना समजून घेण्यासाठी भरपूर मदत होत आहे. परंतु भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी सराव सामने खेळायला मिळणार नाहीत. त्यामुळे ते आपापसातच दोन संघ बनवून सराव करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! सचिन-सेहवागला फिरकीच्या तालावर नाचवणारा गोलंदाज, आता बनलाय ‘टॅक्सी चालक’
धवनला कर्णधार बनवल्याने माजी खेळाडू नाखुश; म्हणे, ‘तो ३१ वर्षीय खेळाडू होता पात्र’
वर्ष २००८मध्ये धोनीने दिली होती नेतृत्तवपद सोडण्याची धमकी? सहकाऱ्याने सांगितले होते सत्य