---Advertisement---

मॉरिसचा खणखणीत शॉट आणि बंदुकीच्या गोळीच्या वेगाने कोहलीने अडवला चेंडू; फलंदाजही म्हणे, काय होतं हे?

On: गुरूवार, सप्टेंबर 30, 2021 10:28 AM
---Advertisement---

बुधवार रोजी (२९ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई येथे आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील ४३ वा सामना झाला. या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीतील धडाकेबाज प्रदर्शनाच्या जोरावर बेंगलोरने राजस्थानवर ७ विकेट्सने सोपा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान फलंदाजीबरोबरच चपळ क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली याने एक नेत्रदिपक झेल घेतला. त्याचा हा झेल पाहून अगदी फलंदाज ख्रिस मॉरिसच्याही भुवया उंचावल्या होत्या.

त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान संघाकडून ख्रिस मॉरिस आणि रियान पराग १९ व्या षटकात फलंदाजी करत होते. बेंगलोरकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे षटक टाकत होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर फलंदाज मॉरिसने ऑफसाइडच्या दिशेने खणखणीत शॉट मारला होता. त्याने मारलेल्या शॉटचा वेग पाहून चेंडू नक्कीच सीमारेषा पार करेल असे वाटत होते. परंतु ऑफसाइडच्या बाजूला क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या कोहलीने ते शक्य होऊ दिले नाही.

कोहलीने अगदी वाऱ्याच्या वेगाने हवेत डाईव्ह मारली आणि चेंडू पकडला. परंतु त्याला अचूक झेल टिपता आला नाही, म्हणून त्याने डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर चेंडू क्षेत्ररक्षकाकडे फेकला. भलेही कोहलीला त्या चेंडूवर मॉरिसची विकेट घेण्यात यश आले नाही, पण त्याच्या प्रयत्नांमुळे संघाच्या ४ धावा वाचल्या.

कोहलीच्या या अनपेक्षित आणि अद्भुत क्षेत्ररक्षणाला पाहून स्वत: फलंदाज मॉरिसचेही तोंड खुलेच्या खुले होते. त्याने कोहलीकडे पाहून हे काय होते, अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली. मैदानातील या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Swapnil_Singh7/status/1443252974990467077?s=20

दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाला २० षटकात ९ गडी गमावत १४९ धावा करण्यात यश आले होते. राजस्थानकडून सलामीवीर एविन लुईसने सर्वाधिक ५८ धावा केल्या होत्या. तर बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बेंगलोरने १७.१ षटकातच ४ विकेट्सच्या नुकसानावर त्यांचे आव्हान पूर्ण केले होते. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५० आणि श्रीकर भरतने ४४ धावा जोडल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

चौकार वा षटकार होता निश्चित, इतक्यात मुस्तफिजुरने सीमारेषेवर अडवला चेंडू अन् बनला ‘सुपरहिरो’

मॅक्सवेल पॅड घालून फलंदाजीसाठी होता तयार; मग चहलने केलं असं काही की, कॅमेरामनही खदखदून हसला!

युझवेंद्रने राजस्थानच्या फलंदाजांचा उडवला धुव्वा, पत्नी धनश्रीचा आनंद अनावर; फोटोंनी वेधले लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---