भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याकडून त्याच्या चाहत्यांना शतकी खेळी अपेक्षा आहे. गेल्या ३ वर्षांपासून त्याच्या बॅटमधून शतक निघालेले नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात शुक्रवारी (२१ जानेवारी) वनडे मालिकेतील दुसरा सामना (Second ODI) झाला. बोलँड पार्क येथे झालेल्या या सामन्यात भारताच्या विराट कोहली (Virat Kohli) ने पुन्हा चाहत्यांची निराशा केली. तो ५ चेंडूंचा सामना केल्यानंतर खातेही न खोलता पव्हेलियनला परतला.
त्याने फिरकीपटू केशव महाराजच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने एक फटका मारला आणि दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बावुमाने झेल टिपत त्याला बाद केले. विराटची ही वनडे क्रिकेटमध्ये खाते न खोलता शून्यावर बाद होण्याची १४ वी वेळ होती.
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
यासह विराट तिन्ही स्वरूपात भारताकडून सर्वाधिकवेळा शून्यावर होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तो ३१ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर विकेट गमावून बसला आहे. याबाबतीत त्याने माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१ वेळा शून्यावर बाद झाला होता. या विक्रमात अव्वलस्थानी सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) आहे, जो ३४ वेळा शून्यावर आपली विकेट गमावून बसला आहे.
त्यामुळे जर अजून ३ वेळा विराट शून्यावर बाद झाला, तर तो सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडण्यापूर्वी सर्वाधिक शून्यांचा विक्रम मात्र नक्कीच मोडेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणारे भारतीय (Most Ducks By Indians)
सचिन तेंडूलकर- ३४
विराट कोहली, विरेंद्र सेहवाग – ३१
सौरव गांगुली – २९
युवराज सिंग – २६
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताला ५० षटकात २८७ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले होते. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली होती. तर कर्णधार केएल राहुलनेही या सामन्यात अर्धशतक ठोकले. तो ५५ धावांवर बाद झाला. याखेरीज शार्दुल ठाकूरने शेवटी फलंदाजीला येत पुन्हा नाबाद ४५ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धोनी स्टाईल स्टंपिंग’ करत क्विंटन डी कॉकने लुटली वाहवा..! वेंकटेश अय्यरच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल
‘झिरो’मुळे विराटचा सोशल मीडियावर होतोय बाजार, मीम्स व्हायरल करत चाहते साधतायत निशाणा
हेही पाहा-