इंडियन प्रीमियर लीगचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स हे २ संघ आज (५ ऑक्टोबर) आमने-सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता हा सामना सुरु होईल. आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंत दोन्ही संघांनी ४ सामने खेळले आहेत, त्यातील प्रत्येकी ३ सामन्यात त्यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसतील.
अशात या सामन्यादरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला काही शानदार विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. काही दिवसांपुर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या बेंगलोर संघाच्या चौथ्या सामन्यात विराटने ७२ धावांची दमदार खेळी केली होती. जर आज दिल्लीविरुद्ध विराटने १० धावा केल्या, तर तो टी२० क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा भारताचा पहिला आणि जगातील ७वा क्रिकेटपटू ठरु शकतो.
विराटने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये २८५ सामने खेळले आहेत. त्यापैकी २७० डावात फलंदाजी करत त्याने ८९९० धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ६५ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटपुर्वी ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएबह मलिक, ब्रेंडन मॅक्यूलम, डेविड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच यांनी टी२० क्रिकेटमध्ये ९००० धावांचा आकडा गाठला आहे.
याव्यतिरिक्त जर विराटने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ७ चौकार मारले, तर आयपीएल इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दूसरा क्रमांक पटकावेल. त्याच्यापुर्वी शिखर धवनने आयपीएलमध्ये सर्वाधिक ५३३ चौकार मारत अव्वल क्रमांक पटकावला आहे. विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८१ सामने खेळत ४८७ चौकार लगावले आहेत. तर गौतम गंभीर ४९२ चौकार आणि सुरेश रैना ४९३ चौकारांसह या यादीत विराटच्या पुढे आहेत. त्यामुळे तो ७ चौकार मारत या दोन्ही फलंदाजांना मागे टाकू शकतो.
याबरोबरच विराटला त्याचे आयपीएलमधील २०० षटकार पूर्ण करण्याचीही संधी आहे. त्यासाठी त्याला अजून ८ षटकारांची आवश्यकता आहे. जर विराटने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याचे २०० षटकार पूर्ण केले, तर तो ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या यादीत सहभागी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबविरुद्धच्या विजयानंतर धोनीने दिली प्रतिक्रिया, ‘या’ गोष्टीमुळे मिळाले यश
फाफ डु प्लेसिसने सांगितले चेन्नई संघाचे वेगळेपण; धोनी, फ्लेमिंगला दिले श्रेय
ट्रेंडिंग लेख-
दरवर्षी मैदान गाजवणाऱ्या ३ खेळडूंना यंदा आयपीएलमध्ये अजूनही मिळाली नाही खेळण्याची संधी
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
अवघड झालंय! ‘या’ ३ संघाचे आयपीएल प्ले ऑफचे मार्ग जवळपास बंद