---Advertisement---

विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मांचे प्रशिक्षकपद धोक्यात! कारणही तितकेच गंभीर

On: गुरूवार, मार्च 31, 2022 5:34 PM
Rajkumar-Sharma-Virat-Kohli
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ त्यांच्या पदावरुन काढण्याचा विचार करत आहे. मागील दोन वर्षांत दिल्लीच्या वरीष्ठ संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. ज्यानंतर अनुभवी प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना डीडीसीए कायम ठेवणार नाही. रणजी ट्राॅफीत खराब प्रदर्शन करणाऱ्या दिल्ली संघाला झारखंडविरुद्ध वाईट पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला होता. संघ गटात सुद्धा सर्वात खाली राहिला होता. संघ बाद फेरीसाठी सुद्धा पात्र झाला नव्हता.

डीडीसीएच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाटीआयसोबत बोलताना सांगितले की, “डीडीसीए संपुर्ण प्रशिक्षक स्टाफला नवे रुप देईल आणि यानंतर पुढील हंगामात राजकुमारचा करार पुढे वाढवला जाणार नाही. दिल्ली संघाने रणजी बरोबरच विजय हजारे आणि सैय्यद मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये खराब कामगिरी केली आहे.”

राजकुमारच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली संघ मागील वर्षी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये सुद्धा पोहोचला नाही. संघाची कामगिरी घसरत गेली आणि यावर्षी संघाची परिस्थीती अजूनच बिघडत गेली. दिल्ली संघ सर्व स्पर्धांमध्ये गटात पुढे जाऊ शकला नाही. राजकुमार प्रशिक्षक असताना प्लेइंग इलेव्हनवर सुद्धा प्रश्न उठवले जात होते. रणजी करंडकमध्ये शानदार खेळाडूंपैकी आयुष बदोनी, वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंह आणि मयंक यादवसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली नव्हती.

डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली म्हणाले की, “भविष्यातील रणनिती ठरवण्यासाठी समिती स्थापण करण्यात आली आहे, ज्यामध्ये मदनलाल, विनय लांबा आणि सुनील वाल्सन यांचा समावेश आहे. आता आम्हाला या गोष्टींवर विचार करायचा आहे की रिषभ पंतला भारतीय संघात निवडल्यानंतर आणि गौतम गंभीरच्या निवृत्तीनंतर आम्ही कोणता कर्णधार का निवडला नाही? याची सुरुवात अंडर १९ पासून होते. ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि आम्ही यावर काम करु.”

महत्त्वाच्या बातम्या-

रिषभच्या दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर, ६.५ कोटींचा ‘हा’ खेळाडू लवकरच होणार ताफ्यात सामील

आरसीबीच्या ‘मॅन ऑफ द मॅच’ हसरंगाच्या स्पेशल सेलिब्रेशनने लुटली मैफील, जाणून घ्या त्यामागचे कारण

विजयाचं खातं उघडण्यासाठी पलटणला ‘मास्टर ब्लास्टर’कडून महत्त्वाच्या टिप्स, मुंबई इंडियन्सने शेअर केला Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---