मुंबई । कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने विराट कोहली अनुष्कासोबत वेळ घालवत आहे. दरम्यान, विराट कोहली सोशल मीडियावर व्यायामाच्या संदर्भातले काही व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत आहे. तसेच त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील अनेक दिवसांनंतर बोल्ड अंदाज मध्ये दिसून आली. अनुष्काने वोग फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केली. ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसून आली.
अनुष्का शर्माने यातील काही फोटो इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेला तिचा हॉट लुक फॅन्सला खूपच पसंत पडत आहेत. बऱ्याच दिवसांनंतर अनुष्का शर्मा बिकिनीमध्ये फोटोशूट करताना दिसून आली. फोटोमध्ये अनुष्का शर्मा ब्लॅक अँड व्हाइट बिकीनवर जॅकेट घातलेली आहे.
फोटोशूटमध्ये अनुष्का शर्मा कधी बिकिनीमध्ये तर कधी क्रॉप टॉपसोबत प्लाजो तर कधी क्रॉप टॉपबरोबर स्कर्ट तर कधी लाँग शर्ट घालून पोज दिली आहे. वोग फॅशन मॅगझीनने देखील अनुष्काचे सर्व फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.
अनुष्का शर्माचा हा फोटोशूट पाहून विराट कोहली देखील क्लीन बोल्ड झाला आहे. अनुष्का शर्माच्या फोटोवर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विराटने फायर इमोजी बरोबर हार्ट इमोजी पोस्ट केले आहे.
https://www.instagram.com/p/CCcrfcTBAJU/
https://www.instagram.com/p/CCc2CsqJUFO/
https://www.instagram.com/p/CCdcbZOJ2Iv/
https://www.instagram.com/p/CCcrdV8hqRd/
https://www.instagram.com/p/CCcsMFKhxkU/
https://www.instagram.com/p/CCcqBZZBWKj/
https://www.instagram.com/p/CCcpoxohe56/
अनुष्का शर्मा ‘झिरो’ या शेवटच्या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात शाहरुख खान आणि कॅटरीना कैफने देखील भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त हिट ठरू शकला नाही. याशिवाय अनुष्का शर्माने नुकतीच ‘पाताळ लोक’ ही वेबसिरीज प्रोड्यूस केली आहे, जी एक चांगली सिरीज आहे.