सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवी आणि निर्णायक कसोटी सामना सुरू आहे. भारत सध्या या मालिकेत २-१ने आआगडीवर असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांत पोहचण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. अशा निर्णायक सामन्यात मात्र पहिल्याच दिवशी भारताची अवस्था दयनिय झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली डाव सावरेल अशी अपेक्षा होती मात्र, तोही या सामन्यात विशेष कामगिरी करण्यास असफल ठरला.
आत्तापर्यंत या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांना काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. सलामीवीर म्हणून खेळायला आलेल्या शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी १७ आणि १३ धावांची खेळी केली. शिवाय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हनुमा विहारी आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी २० आणि ११ धावांची खेळी केली. त्यामुळे भपारतीय संघाला पहिल्या दिवसाच्या २७ षटकांच्या अखेरीस ४ बळी गमावत केवळ ९० धावा करता आल्या.
दरम्यान, या सामन्याआधी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाल्या कारणाने तो संघात सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे भारताचे नेतृत्व वेगवीन गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो’ प्लेअर आम्हाला कर्णधार पेक्षा खेळाडू म्हणून गरजेचा!, प्रशिक्षक राहुल द्रविडची थेट प्रतिक्रिया
INDvENG। पाचवा कसोटी सामना सुरू, वाचा काय आहे पहिल्या चार सामन्यांचा निकाल
ICC WTC। श्रीलंकेला हरवत ऑस्ट्रेलियाने आपले पहिले स्थान ठेवले अबाधित, पाहा भारत कितव्या स्थानावर