भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी एकही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना शनिवारी (१९ जून) सुरु झाला. न्यूझीलंडच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत भारताचे तीन प्रमुख फलंदाज बाद केले. या दरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या नावे कर्णधार म्हणून दोन विक्रम जमा झाले.
चांगल्या सुरुवातीनंतर भारताने गमावले तीन गडी
न्यूझीलंडने फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर अनुभवी रोहित शर्मा प्रथमच इंग्लंडच्या धर्तीवर कसोटी सामना खेळत असलेल्या शुबमन गिल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६३ धावा केल्या असताना, रोहित ३४ धावांवर बाद झाला. तर, गिलला २८ धावांवर नील वॅग्नरने तंबूचा रस्ता दाखवला. ३५ चेंडूंनंतर खाते खोलणार्या चेतेश्वर पुजाराची खेळी ८ धावांच्या पुढे जाऊ शकली नाही.
कर्णधार-उपकर्णधाराने सांभाळला डाव
भारताचे ८८ धावांवर तीन गडी बाद झाले असताना कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी खरा प्रकाशामुळे खेळ थांबला असताना आणखी पडझड होऊ देतात संघाला १४६ पर्यंत मजल मारून दिली होती. विराट ४४ तर, रहाणे २९ धावांवर नाबाद आहे.
विराटच्या नावे दोन नवे विक्रम
आपल्या नाबाद ४४ धावांच्या खेळीदरम्यान विराट कोहलीने इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून ६०० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो आशियातील पहिला कर्णधार आहे. त्याने या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले. धोनीच्या नावे इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून ५६९ धावा होत्या.
९० च्या दशकांत भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या मोहम्मद अजहरुद्दिन यांनी इंग्लंडमध्ये कर्णधार या नात्याने खेळत ४६८ धावांचे योगदान दिलेले. या यादीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज व पाकिस्तानचे दिग्गज कर्णधार इम्रान खान यांचा क्रमांक लागतो या दोघांनीही अनुक्रमे ४३१ व ४०३ धावा बनविल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC Final: पुजाराने खाते उघडण्यासाठी घेतले तब्बल ३६ चेंडू, चाहत्यांनी साधली ट्रोलिंगची संधी
‘या’ कारणाने WTC फायनलमध्ये दिली अश्विन-जडेजाच्या फिरकी जोडीला संधी, विराटने केला खुलासा
विराट-विलियम्सनने खोलला मैत्रीचा पेटारा, एकमेकांबद्दल व्यक्त केला अशा भावना, व्हिडिओ व्हायरल