---Advertisement---

विराट-विलियम्सनने खोलला मैत्रीचा पेटारा, एकमेकांबद्दल व्यक्त केला अशा भावना, व्हिडिओ व्हायरल

On: शनिवार, जून 19, 2021 9:35 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अखेर शनिवारी (१९ जून) सुरुवात झाली. हा सामना शुक्रवारपासून सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे पहिल्या दिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही. पण, शनिवारी सामन्याला सुरुवात झाली. त्यापूर्वी आयसीसीने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट आणि केन विलियम्सन त्यांच्यातील मैत्रीबद्दल बोलत आहेत.

विराट आणि विलियम्सन एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात. त्या दोघांनी १९ वर्षांखालील क्रिकेटही एकाचवेळी खेळले आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट म्हणत आहे की ‘मी क्रिकेट जगतातील खूप कमी खेळाडू माझ्या जास्त जवळचे आहेत आणि त्यातील केन विलियम्सन एक खेळाडू आहे. आम्ही एकमेकांशी जोडलेले असतो. क्रिकेट व्यतिरिक्त देखील आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो, कारण आम्ही ज्याप्रकारे एकमेकांचा सन्मान करतो, त्याचमुळे आमच्यात चांगली मैत्री आहे.’

तो पुढे म्हणाला, ‘विलियम्सन ज्याप्रकारे त्याच्या आयुष्याबद्दल विचार करतो आणि त्याची लाईफस्टाईल माझ्याशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे आमची मैत्री टिकून आहे. आम्ही १९ वर्षांखालील क्रिकेटपासून एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. तो नक्कीच चांगला प्रतिस्पर्धी आहे, पण त्याचबरोबर तो एक चांगला व्यक्ती आहे आणि तो तुमचा खूप आदर करतो.’

याबरोबरच केन विलियम्सन म्हणाला, ‘विराट एक चांगला खेळाडू आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये बदल घडला आहे. त्याच्यामध्ये खेळण्याची भूक आहे आणि त्याचे नेतृत्वही शानदार असते. त्याच्याविरुद्ध गेल्या अनेकवर्षापासून खेळणे, चांगले होते. आम्ही अनेकदा मोठ्या स्तरावर एकमेकाविरुद्ध नाणेफेकीवेळी उभे राहिलो आहे आणि सामनेही खेळले आहेत.’

विराट-विलियम्सनचा फोटो व्हायरल
जेव्हा भारताने २०२० साली सुरुवातीला न्यूझीलंडचा दौरा केला होता, त्यावेळी विराट आणि विलियम्सनचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यावेळी एका सामन्यादरम्यान हे दोघे अंतिम ११ जणांच्या संघात खेळत नसल्याने बाऊंड्री लाईनबाहेर गप्पा मारत बसले होते. त्याक्षणाचा फोटो व्हायरल झाला होता.

१९ वर्षांखालील क्रिकेटपासूनचे प्रतिस्पर्धी
विराट आणि विलियम्सन २००८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात अनुक्रमे भारत आणि न्यूझीलंड संघांचे कर्णधार होते. त्यावेळीही ते उपांत्य फेरीमध्ये एकमेकांसमोर आले होते. त्यानंतर कर्णधार म्हणून ते २०१९ विश्वचषकातही कर्णधार म्हणून उपांत्य सामन्यातच एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आता हे दोघे पहिल्या वहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार म्हणून एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

जॅक कॅलिसला मागे टाकत कोहलीने मिळवले दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

भारतीय प्रशिक्षकाने केली रोनाल्डोची नक्कल; व्हिडिओ भन्नाट व्हायरल

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात कोहलीची खास कामगिरी, ‘या’ विक्रमात केली गावसकरांची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---