---Advertisement---

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात कोहलीची खास कामगिरी, ‘या’ विक्रमात केली गावसकरांची बरोबरी

On: शनिवार, जून 19, 2021 7:53 PM
Virat-Kohli
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने आयोजित केलेली पहिली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार (१९ जून) पासून इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड या विद्यमान क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना खेळवला जातो आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ टप्पा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करतांना कसोटी कारकिर्दीतील ७५०० धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या पाच भारतीय फलंदाजांनी हा टप्पा गाठला होता. आता या खास यादीत कोहलीचा देखील समावेश झाला आहे. यातील विशेष बाब म्हणजे कोहली व्यतिरिक्त या यादीतील इतर सर्व फलंदाज निवृत्त झाले आहेत.

भारतासाठी कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा –
१) सचिन तेंडुलकर – १५९२१
२) राहुल द्रविड – १३२६५
३) सुनील गावसकर – १०१२२
४) व्हीव्हीएस लक्ष्मण – ८७८१
५) वीरेंद्र सेहवाग – ८५०३
६) विराट कोहली – ७५००*

‘या’ विक्रमात केली गावसकरांची बरोबरी
त्याचप्रमाणे विराट कोहली यावेळी ७५०० धावा पूर्ण करणारा सगळ्यात वेगवान भारतीय फलंदाज देखील ठरला. त्याने १५४व्या डावात कसोटी कारकिर्दीतील ७५०० धावा पूर्ण केल्या. या विक्रमात त्याने माजी महान फलंदाज सुनील गावसकरांची बरोबरी केली. गावसकर यांनी देखील १५४ डावात ७५०० धावा पूर्ण केल्या होत्या. त्याचप्रमाणे ७५०० धावांचा टप्पा गाठणारा कोहली संपूर्ण जगातील ४२वा तर भारताचा सहावा खेळाडू ठरला.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्यांदाच कॉमेंट्री करण्यासाठी उतरलेल्या दिनेश कार्तिकने जिंकली चाहत्यांची मने; म्हणाला

कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळताच, कुटुंबासोबत एमएस धोनी पोहोचला ‘शिमला’

शेफालीचे ‘अविस्मरणीय’ पदार्पण! दोन अर्धशतकांसह केले अनेक विक्रम नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---