---Advertisement---

शेफालीचे ‘अविस्मरणीय’ पदार्पण! दोन अर्धशतकांसह केले अनेक विक्रम नावे

On: शनिवार, जून 19, 2021 6:42 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड महिला संघाविरुद्ध ब्रिस्टल येथे एकमेव कसोटी सामना खेळत आहे. यजमान इंग्लंडने सामन्याच्या अखेरच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय संघाला झटपट बाद करण्यात त्यांना यश आले होते. मात्र, या सामन्यातून कसोटी पदार्पण करणारी भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्मा हिने आपल्या फलंदाजीने सर्वांचे मने जिंकली. दोन्ही डावात अर्धशतके झळकावताना अनेक विक्रमांना गवसणी घातली.

शेफालीने सोडली सामन्यावर छाप
भारतीय महिला टी२० संघाची नियमित सदस्य असलेल्या १७ वर्षीय शेफाली वर्माने इंग्लंड विरुद्धच्या या एकमेव कसोटीतून पदार्पण केले. हा सामना तिच्यासाठी अविस्मरणीय असा राहिला. या पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकावताना तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

शेफालीने रचले अनेक विक्रम
शेफाली वर्माने या सामन्यात पदार्पण करताना भारताकडून सर्वात कमी वयात कसोटी खेळणारी तिसरी युवा महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. तिने या सामन्यातील पहिल्या डावात ९६ धावांची खेळी केली. ही कोणत्याही भारतीय महिला क्रिकेटपटूने पदार्पणात केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. या खेळी दरम्यान तीने आपली सहकारी स्मृती मंधानासह १६७ धावांची सलामी भागीदारी देताना भारतासाठी सर्वोच्च सलामीचा विक्रम नोंदवला.

शेफालीने भारताच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाजी करत ६३ धावा साकारल्या. तिने दोन्ही डावात मिळून तीन षटकार खेचत महिला क्रिकेटच्या कसोटी सामन्यात एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार खेचणारी महिला खेळाडू होण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी कोणत्याही महिला खेळाडूने कामगिरी केली नव्हती ‌

यासह शेफाली पदार्पणाच्या सामन्यातील दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आली. तिने दोन्ही डावात मिळून १५९ धावा बनविल्या. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या मिशेल गोस्को अव्वलस्थानी असून, तीने २००१ मध्ये २०४ धावा बनविल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रतिस्पर्धी खेळाडूला वीट फेकून मारणे बांगलादेशी क्रिकेटपटूला पडले महागात; बोर्डाने ठोठावला मोठा दंड

अगंगंगंगं! कोहली नाणेफेक हारला अन् मिम्सचा पाऊस सुरु झाला

याला म्हणतात गेम! टॉसपुर्वी न्यूझीलंडने विराट कोहलीच्या टीम इंडियाचा असा केला ‘गेम’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---