---Advertisement---

अगंगंगंगं! कोहली नाणेफेक हारला अन् मिम्सचा पाऊस सुरु झाला

On: शनिवार, जून 19, 2021 6:14 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आज (१९ जून) पासून इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ कसोटी क्रिकेटचे सर्वोच्च विजेतेपद पटकावण्यासाठी आमनेसामने आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली.

मात्र या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोहली नाणेफेक हरल्यावर सोशल मिडीयावर भन्नाट मिम्स व्हायरल होऊ लागले.

कोहलीचा खराब रेकॉर्ड
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहली नाणेफेक हरला, तेव्हा अनेकांनी त्यावर हे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. कारण कोहलीचा कर्णधार म्हणून नाणेफेक जिंकण्याचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे. त्यामुळे जणूकाही चाहत्यांना देखील कोहलीच्या नाणेफेक हरण्याची सवय झाली आहे. मात्र आज देखील जेव्हा कोहली पुन्हा नाणेफेक हरला, तेव्हा चाहत्यांनी त्याची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही.

त्यामुळेच कोहलीने नाणेफेक गमावल्यानंतर सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस पडला. एका मिममध्ये ‘नाणेफेक हरण्यासाठी ऑलिम्पिक पदक मिळाले असते तर कोहलीला असंख्य पदके मिळाले असते’, असे म्हंटले आहे. तर एका मिम मध्ये अजय देवगणचा ‘कुछ नहीं बदला यार, सबकुछ वैसे का वैसा ही है’, हा संवाद कोहलीचा नाणेफेकीचा रेकॉर्ड सांगण्यासाठी वापरण्यात आला आहे.

https://twitter.com/AjessePinkman/status/1406178136950145026?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406178136950145026%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-netizens-spark-meme-feast-after-virat-kohli-toss-loss-yet-again-in-wtc-final-2896207

https://twitter.com/i_m_yash__/status/1406176821754748933?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406176821754748933%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-netizens-spark-meme-feast-after-virat-kohli-toss-loss-yet-again-in-wtc-final-2896207

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1406175959368159233?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406176167485263873%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-netizens-spark-meme-feast-after-virat-kohli-toss-loss-yet-again-in-wtc-final-2896207

https://twitter.com/venomous_la_vie/status/1406177459498676225?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406177459498676225%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-netizens-spark-meme-feast-after-virat-kohli-toss-loss-yet-again-in-wtc-final-2896207

https://twitter.com/crushmajor012/status/1406179154807070724?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406179154807070724%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-netizens-spark-meme-feast-after-virat-kohli-toss-loss-yet-again-in-wtc-final-2896207

https://twitter.com/sab_mein_expert/status/1406178872559738882?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406178872559738882%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-netizens-spark-meme-feast-after-virat-kohli-toss-loss-yet-again-in-wtc-final-2896207

https://twitter.com/ankus_59/status/1406176956056436740?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406176956056436740%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-netizens-spark-meme-feast-after-virat-kohli-toss-loss-yet-again-in-wtc-final-2896207

https://twitter.com/iam_rahuldavid/status/1406178840641032196?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406178840641032196%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-netizens-spark-meme-feast-after-virat-kohli-toss-loss-yet-again-in-wtc-final-2896207

अंतिम सामन्याला एक दिवस उशिराने सुरुवात
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवार (१८ जून) पासून सुरू होणे, अपेक्षित होते. मात्र पहिल्या दिवशी दिवसभर साऊथम्पटन मध्ये पावसाची संततधार होती. त्यामुळे पहिल्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पण दुसर्‍या दिवशी म्हणजेच १९ जूनला हवामान निरभ्र असल्याने सामन्याला सुरुवात झाली. मात्र आयसीसीने पावसाची शक्यता लक्षात घेऊन यापूर्वीच राखीव दिवसाची तरतूद केली आहे. त्यामुळे पहिला दिवस वाया गेला असला तरी अजूनही पूर्ण पाच दिवसांचा खेळ होणे शक्य आहे.

महत्वाच्या बातम्या-

भन्नाटच! रिषभ पंतची बहीण इंग्लंडमध्ये करतेय मज्जा; व्हिडिओत दिसली झोका खेळताना

WTC Final 2021, भारत वि. न्यूझीलंड: टॉस जिंकून न्यूझीलंडचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; ऐतिहासिक जेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज

‘विराटच्या भिडू’ला हवी आहे अदृश्य होण्याची सुपरपावर, पण का? वाचा कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---