---Advertisement---

‘विराटच्या भिडू’ला हवी आहे अदृश्य होण्याची सुपरपावर, पण का? वाचा कारण

On: शनिवार, जून 19, 2021 3:04 PM
---Advertisement---

प्रत्येकाची जीवनात काही-ना-काही काल्पनिक स्वप्ने असतात. जसे एखादी सुपरपॉवर किंवा अलादिनचा जीन. जगात सर्वांचीच इच्छा असते की आपल्यालाही अशी एखादी सुपरपावर मिळावी. अशीच काही इच्छा भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरची आहे. त्याने एका व्हिडिओ चॅटमध्ये आपली काल्पनिक इच्छा प्रकट केली आहे.

भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला गायब होणारी सुपरपावर हवी आहे आणि ही सुपरपावर मागण्यामागील कारणही क्रिकेटशी संबंधित सांगितले आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार्‍या सुंदरने क्रिकइन्फोशी झालेल्या व्हिडिओ चॅटमध्ये भाग घेतला होता. यात त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

दरम्यान त्याला एक प्रश्न विचारला गेला त्यात त्याला विचारण्यात आला की, तुला एखादी सुपरपावर मिळत असेल तर तू कोणती घेशील? त्यात उत्तर देत २१ वर्षीय सुंदर कि, “मी अदृश्य होण्याची सुपरपावर मागेल. जेणेकरून मी विरोधी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करू शकेल आणि त्यांची गुपिते जाणून घेऊ शकेल.”

याबरोबरच त्याला विचारले गेले की त्याचा आदर्श कोण आहे? तर त्याने दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचे नाव घेतले आहे. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, वाढदिवसाची भेट म्हणून तो आपल्या वडिलांना महागडे घड्याळ आणि गाडी देऊ इच्छितो.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुंदरने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत चार कसोटी, एक वनडे आणि ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या ऑफ स्पिनरने कसोटीमध्ये एकूण ६ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात एक आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटी कारकीर्दीत एकूण २६५ धावा केल्या असून त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि भारतात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

प्रशिक्षक, मार्गदर्शक अन् प्रेरक; भारतीय संघाच्या WTC प्रवासामधील ‘नायका’चा व्हिडिओ पाहिलाय का?

क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! आज रंगणार आहे तब्बल १० सामन्यांचा थरार, पाहा वेळापत्रक

जेव्हा पावसामुळे तब्बल १२ दिवस चालला होता कसोटी सामना, तरीही नव्हता लागला निकाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---