---Advertisement---

याला म्हणतात गेम! टॉसपुर्वी न्यूझीलंडने विराट कोहलीच्या टीम इंडियाचा असा केला ‘गेम’

On: शनिवार, जून 19, 2021 6:08 PM
---Advertisement---

साऊथॅम्पटन। जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी(१९ जून) सुरु झाला. द रोज बाऊल, एजबस्टन स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात हा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीपूर्वी खेळलेली एक चाल भारताला भारी पडू शकते.

हा सामना खरंतर शुक्रवारी सुरु होणार होता. मात्र, शुक्रवारी(१८ जून) पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकही होऊ शकली नव्हती. अखेर शनिवारी ऊन पडल्याने सामन्याला नियोजित वेळेत सुरुवात झाली. दरम्यान, शनिवारी नाणेफेक होईपर्यंत न्यूझीलंड संघाने आपला अंतिम ११ जणांचा संघ जाहीर केला नव्हता. त्यामुळे, न्यूझीलंड कोणाला संधी देणार ही उत्सुकता होतीच. याबरोबरच वातावरणाच्या बदललेल्या परिस्थितीनुसार त्यांना संघ निवडताना फायदा झाला.

इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाजांना जास्त फायदा होतो. त्यातही अशा वातावरणात ड्यूक चेंडूवर गोलंदाजांना उत्तम स्विंग मिळतो. त्यामुळे न्यूझीलंडने एकाही फिरकीपटूचा अंतिम ११ जणांच्या संघात स्थान न देता काईल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी आणि नील वॅग्नर या ४ वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. तसेच कॉलिन डी ग्रँडहोम हा मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू त्यांच्या संघात आहे.

एवढेच नाही तर खालच्या फळीत जेमिसन आणि साऊथी फलंदाजीमध्येही थोडेफार योगदान देऊ शकतात. तसेच जर फिरकी गोलंदाजीची गरज पडल्यास काही षटके कर्णधार केन विलियम्सन गोलंदाजी करताना दिसू शकतो. विलियम्सनने कसोटीत आत्तापर्यंत ३० विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे नाणेफेकीनंतर संघ जाहीर करणे न्यूझीलंडसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे, भारताने गुरुवारीच (१७ जून) आपला ११ जणांचा अंतिम संघ जाहीर केला होता. त्यांनाही नाणेफेक होण्यापूर्वी संघ बदलण्याची संधी होती. मात्र, त्यांनी २ दिवसांपूर्वी निवडलेलाच संघ कायम केला आहे. या संघात इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे तीनच वेगवान गोलंदाज आहेत. तसेच आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे फिरकीपटू आहेत.

तीनच वेगवान गोलंदाज खेळत असल्याने भारतासाठी हे धोक्याचे ठरु शकते. कारण थंड वातावरणात जर स्विंग गोलंदाजीला मदत मिळत असेल तर आणखी एक वेगवान गोलंदाज भारताला खेळवता आला असता. मात्र, अश्विन आणि जडेजा यांचे फलंदाजीतील योगदानाचा विचार करता कदाचीत भारताने या दोघांनाही खेळवण्याची धोका पत्करलेला असावा.

त्याचबरोबर साऊथॅम्पटनमध्ये ऊन पडल्यास फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे, हा विचारही भारताने केला असावा की जर वातावरण बदलले तर जडेजा आणि अश्विन संघात असणे फायदेशीर ठरु शकते.

मात्र, सध्यातरी पुढील ४-५ दिवस तरी साऊथॅम्टनमध्ये ढगाळ वातावरणाचाच अंदाज आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडची नाणेफेकीनंतर संघ जाहीर करण्याची चाल भारतावर खरंच भारी पडणार का हे पाहावे लागणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेले श्रीसंत-चव्हान आजीवन बंदीतून मुक्त, ‘या’ खेळाडूचीही गांगुलीकडे धाव; लिहिलं पत्र

विराटने नाणेफेक करताच क्षणी जगातील सर्वात खास विक्रम झाला रोहितच्या नावावर

भारतीय प्रशिक्षकाने युवा सलामीवीराचे गायले गुणगान; म्हणे, ‘तिच्यात सेहवागची झलक दिसते’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---