---Advertisement---

विराटने नाणेफेक करताच क्षणी जगातील सर्वात खास विक्रम झाला रोहितच्या नावावर

---Advertisement---

एजबॅस्टन येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने दोन दिवसापूर्वीच जाहीर केलेल्या संघात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघासाठी अनुभवी रोहित शर्मा व युवा शुबमन गिल यांनी सलामी दिली. या सामन्यासाठी मैदानात उतरताच रोहित शर्माच्या नावे एक खास विक्रम जमा झाला.

दोन अंतिम सामने खेळणारा रोहित पहिला खेळाडू
कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच खेळल्या‌ जात असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना शनिवारपासून (१९ जून) एजबॅस्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर सुरु झाला आहे. हा सामना १८ जूनपासून सुरू होणार होता. मात्र, एजबॅस्टन येथे सातत्याने पाऊस पडल्याने मैदान खराब झाले. या कारणाने आयोजकांनी पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे रद्द केला.

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ या ऐतिहासिक सामन्यात सहभागी होत असताना अनुभवी रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. संघात निवड होताच रोहित शर्मा हा आयसीसीच्या कोणत्याही दोन स्पर्धांच्या पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात खेळणारा पहिला खेळाडू ठरला.

रोहित यापूर्वी २००७ मध्ये पहिल्यांदा खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामना खेळला होता. विशेष म्हणजे तो सामना भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून जिंकत विश्वविजेतेपद पटकावले होते.

रोहितच्या नावे दोन आयसीसी विजेतेपदे
रोहित शर्माने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सहभाग घेतला आहे. त्यापैकी २००७ टी२० विश्वचषक व २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा तो भाग राहिला आहे. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. त्यानंतर आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळून तो प्रथमच खेळत असलेल्या आणखी एका आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय प्रशिक्षकाने युवा सलामीवीराचे गायले गुणगान; म्हणे, ‘तिच्यात सेहवागची झलक दिसते’

भारीच ना! थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीच पूर्ण केली होती मिल्खा सिंग यांची प्रेमकहाणी; असं जुळलं होतं सूत

अनोखी हेअरस्टाईल ठेवणाऱ्या न्यूझीलंडच्या अष्टपैलूने धोनी, पंत अन् पंड्याच्या हेअरस्टाईलला दिले ‘इतके’ गुण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---