क्रिकेट असो किंवा अन्य कोणताही खेळ असो. अनेक चाहते खेळाडूंची लाईफस्टाईल फॉलो करत असतात. भारतामध्ये तर क्रिकेटपटू एखाद्या सुपरस्टार जीवन जगतात. खेळाडूंच्या कपड्यापासून ते त्यांच्या हेअर स्टाईलपर्यंत या सर्वच गोष्टी चाहते फॉलो करत असतात. परंतु खूप वेळा असे होते की, क्रिकेटपटू काहीतरी वेगळे हेअर स्टाईल ठेवतात जी चाहत्यांमध्ये खूप आकर्षक बनते. यामध्ये न्यूझीलंडचा खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमचाही समावेश आहे. तो विशिष्ट प्रकारची हेअरस्टाईल ठेवतो आणि त्यासाठी तो चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
यासंदर्भात कॉलिन डी ग्रँडहोमला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता. या मुलाखतीत कॉलिनने एमएस धोनी, रिषभ पंत, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या आणि लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंच्या हेअरस्टाईलला 10 पैकी गुण दिले.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात द रोज बाऊलमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारपासून (19 जून) खेळला जात आहे. यापूर्वी शुक्रवारी (18 जून) सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू नाराज झाले होते. मात्र, यादरम्यान स्पोर्ट्स निवेदिका आणि भारतीय संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमची मुलाखत घेतली. (In this tournament, MS Dhoni is in the lead while Rishabh Pant and Hardik Pandya are in the second position)
Long locks? Short locks? Coloured? Straightened? ????♂️
Watch Colin ‘mullet’ de Grandhomme evaluate some interesting hairstyles ????#WTC21 | #INDvNZ pic.twitter.com/UbA0UmKHbw
— ICC (@ICC) June 19, 2021
याच दरम्यान त्याने रिषभ पंतच्या लाल रंगाच्या हेअरस्टाईलला 10 पैकी 9 गुण दिले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या लांब केसांना त्याने 10 पैकी 10 गुण दिले, तर ईशांत शर्माच्या हेअरस्टाईलला 10 पैकी 6 गुण दिले. तसेच हार्दिक पंड्याला गॅंगस्टर म्हणत 10 पैकी 9 गुण दिले. दुसरीकडे श्रीलंका संघाचा दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगाला 10 पैकी 10 गुण दिले. अशा प्रकारे हेअर स्टाईल या स्पर्धेमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि लसिथ मलिंगा प्रथम स्थानावर, तर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत द्वितीय स्थानावर आहेत. मात्र, ईशांत शर्माला सर्वात कमी गुण देण्यात आले आहेत.
संजना गणेशन आयसीसीची सादरकर्ता म्हणून इंग्लंडमध्ये आहे. याच्या अगोदर संजनाने तिचा पती आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची देखील मुलाखत घेतली होती. यामध्ये तिने जसप्रीतच्या लहानपणाच्या आठवणींवर चर्चा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिऱ्याहूनही जास्त चमकतो माझा घाम’, म्हणत धवनने केला फोटो शेअर; रोहितही झाला इंप्रेस
‘किवींना बालपणीपासूनच स्विंग चेंडूची सवय, पण भारतीयांच तसं नाही,’ दिग्गज गोलंदाज चिंतेत