---Advertisement---

टी20 वर्ल्डकप 2026 होणार भारतात, अन् 20 संघ असे ठरतील पात्र, घ्या जाणून सविस्तर

T20-World-Cup-2024
---Advertisement---

आयपीएलला जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडी टी-20 लीग म्हणून ओळखल जातं. तसेच सर्वात मोठ्या श्रीमंत क्रिकेट बोर्डाची आयपीएल लीग यंदा 22 मार्च पासून सुरु होणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु यांच्यातील सामन्याने होणार आहे. तसेच टी20 वर्ल्डकप अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. असं सर्व असताना 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. 

याबरोबरच, टी20 वर्ल्डकप हा प्रत्येकी दोन वर्षांनी येत असतो. पण या वर्षापासून एकूण 20 संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पहायला मिळणार आहे. तसेच  वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तरित्या स्पर्धेचं आयोजन केलं असून 1 जून ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा असणार आहे. असं असताना आयसीसीने पुढच्या टी20 वर्ल्डकपची तयारी सुरु केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 2026 या वर्षी असणार आहे. या स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंका हे दोन देश मिळून करणार आहेत.

अशातच टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. यात 12 संघ हे रँकिंगद्वारे आणि वर्ल्डकपमधील कामगिरीच्या आधारावर पात्र ठरणार आहेत. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील टॉप 8 संघ थेट 2026 टी20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरणार आहेत. तर दोन ते चार संघ हे आयसीसी रँकिंगच्या आधारावर आपली जागा निश्चित करतील. तर या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या टॉप 8 संघात भारत आणि श्रीलंका हे संघ नसले तरी थेट एन्ट्री मिळणार आहे.

https://twitter.com/ragav_x/status/1768591053324726577

दरम्यान, भारत आणि श्रीलंका या संघांनी टॉप 8 मध्ये जागा मिळवली तर मात्र इतर चार संघ रँकिंगच्या आधारावर पात्र ठरतील. तर उर्वरित 8 संघ हे प्रादेशिक पात्रतेच्या आधारावर ठरवले जातील. तसेच भारत आणि श्रीलंकेत या स्पर्धेचं आयोजन होणार असल्याने हे दोन संघ आधीच पात्र ठरतील.

https://twitter.com/JonesVincentt/status/1768592298923958763

2024 वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले 20 संघ पुढीलप्रमाणे – अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी (पीएनजी), स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, युगांडा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) ) आणि वेस्ट इंडिज.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---