---Advertisement---

क्या बात! ८९ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडलंय असं, टीम इंडियाने केला वेगळाच कारनामा

On: शनिवार, जून 19, 2021 4:10 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरुवात झाली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार हा सामना १८ जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, एजबॅस्टनमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सामना प्रत्यक्षात एक दिवस उशिरा सुरु झाला. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताना भारतीय संघाने वेगळाच कारनामा नोंद केला.

भारतीय संघ प्रथमच खेळतो अशा ठिकाणी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळला जात आहे. मात्र, अंतिम सामन्यात सहभागी होणारे संघ भारत आणि न्यूझीलंडचे आहेत. या सामन्यात मैदानावर उतरताना भारतीय संघाने प्रथमच त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळण्याचा कारनामा केला.

भारतीय संघ १९३२ पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत तब्बल ८९ वर्षाच्या इतिहासात भारतीय संघाने कधीही तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळला नव्हता. परंतु, या ऐतिहासिक सामन्यात सहभागी होताना विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ही कामगिरी देखील केली.

भारतीय संघ खेळला आहे इतके सामने
कर्नल सी.के नायडू यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने १९३२ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघाने ५५० कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी २७६ सामने भारताने आपल्या मायदेशात खेळले असून यामध्ये संघाला १०९ सामन्यात विजय तर, ५३ सामन्यात पराभव पत्करावे लागले. भारताने परदेशात खेळलेल्या २७४ कसोटी सामन्यात केवळ ५३ विजय मिळवले असून, तब्बल ११६ सामन्यात संघाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘विक्रमवीर’ विराट! एमएस धोनीला मागे टाकत ‘कर्णधार’ कोहलीने केला नवा विक्रम प्रस्तापीत  

WTC फायनलमध्ये ‘अशाप्रकारे’ भारतीय संघाने वाहिली मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली

टॉसला जाण्यापुर्वी विराटने केली होती एक भावनिक पोस्ट, चाहत्यांनाही आलं गहिवरुन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---