---Advertisement---

टॉसला जाण्यापुर्वी विराटने केली होती एक भावनिक पोस्ट, चाहत्यांनाही आलं गहिवरुन

On: शनिवार, जून 19, 2021 3:10 PM
---Advertisement---

अखेर पावसाच्या व्यत्ययानंतर शनिवार रोजी (१९ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना सुरू झाला आहे. इंग्लंडमधील द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे हा सामना खेळवला जात आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता या सामन्यासाठी नाणेफेक झाली होती. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागल्याने त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण निवडत भारतीय संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. तत्पुर्वी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्याच्या शब्दांनी नेटिझन्स भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

शुक्रवारी रात्री मोहालीतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी ते ९१ वर्षांचे होते. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांना सुटकेचा नि:श्वास सोडला होता. तरीही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर शुक्रवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

यानंतर क्रिडाजगतातून हा महान दिग्गज हरपल्याने शोक व्यक्त केला जात आहे. अशात भारतीय संघाचा कर्णधार कोहलीनेही त्यांना श्रद्धांजली वाहिली. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी मैदानावर उतरण्यापुर्वी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्याने मिल्खा सिंगसोबतचा आपला एक फोटो पोस्ट केला.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘एक वारसा ज्याने संपूर्ण देशाला उत्कृष्ट बनण्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले, कधीही हार मानाची नाही आणि सदैव स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहायचे, हे शिकवले. तुमच्या आत्म्यास शांती लाभो मिल्खा सिंगजी. तुम्ही सदैव आमच्या मनात राहाल.’ विराटच्या या शब्दांनी सर्वांनाच गहिवरुन आले आहे. अनेकांनी या ट्विटवर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, महान धावपटू मिल्खा सिंग यांना ऐतिहासिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातूनही श्रद्धांजली वाहिली गेली. सामन्यापुर्वी भारताचे राष्ट्रगीत चालू असताना सर्व भारतीय खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

WTC Final 2021, भारत वि. न्यूझीलंड: टॉस जिंकून न्यूझीलंडचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; ऐतिहासिक जेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज

WTC फायनलमध्ये ‘अशाप्रकारे’ भारतीय संघाने वाहिली मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली

‘किवींना बालपणीपासूनच स्विंग चेंडूची सवय, पण भारतीयांच तसं नाही,’ दिग्गज गोलंदाज चिंतेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---