---Advertisement---

WTC फायनलमध्ये ‘अशाप्रकारे’ भारतीय संघाने वाहिली मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली

On: शनिवार, जून 19, 2021 3:18 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला शनिवारपासून (१९ जून) सुरुवात झाली. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर १८ जूनपासून हा सामना सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे पहिल्या दिवशी सामना सुरू होऊ शकला नाही. शनिवारी सामना सुरू होताना भारतीय संघाने मैदानावर उतरताना भारताचे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

भारतीय संघाने वाहिली मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली
भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मैदानावर उतरताना आपल्या दंडावर काळी पट्टी बांधलेली दिसून आली. हे काळी पट्टी शुक्रवारी रात्री निधन झालेले दिग्गज भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली म्हणून बांधण्यात आल्याचे सांगितले गेले. भारतीय संघ सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभा राहिल्यानंतर खेळाडूंनी ही पट्टी बांधल्याचे दिसून आले.

मिल्खा सिंग यांचे दुःखद निधन
ॲथलेटिक्स जगतात भारताची पहिली ओळख म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ते महान धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते ९१ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र, ते यातून बरे होऊ शकले नाहीत. मागील आठवड्यात मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल कौर यांचेदेखील कोरोनामुळेच निधन झाले होते. निर्मल या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या. (Team India tie black band on arm in WTC final for Milkha Singh)

एक दिवस उशिरा सुरु झाला सामना
दोन वर्षापासून खेळवल्या जात असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला नियोजित कार्यक्रमानुसार १८ जूनपासून सुरुवात होणार होती. मात्र, १७ जून व १८ जून सकाळी एजबॅस्टनमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने, मैदान खराब झाले होते. या कारणाने आयोजकांनी पहिल्या दिवसाचा खेळ नाणेफेक न करता रद्द केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

WTC Final 2021, भारत वि. न्यूझीलंड: टॉस जिंकून न्यूझीलंडचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; ऐतिहासिक जेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज

‘विराटच्या भिडू’ला हवी आहे अदृश्य होण्याची सुपरपावर, पण का? वाचा कारण

‘हिऱ्याहूनही जास्त चमकतो माझा घाम’, म्हणत धवनने केला फोटो शेअर; रोहितही झाला इंप्रेस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---