---Advertisement---

धनश्री वर्मा’घरच्यांना यामुळे फरक पडतोय…’, ट्रोलर्सवर संतापली धनश्री वर्मा, वाचा काय आहे प्रकरण

---Advertisement---

धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती वेळोवेळी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. पण याचसाठी अनेकदा तिला ट्रोल देखील केले जाते. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. पण प्रत्येक वेळी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणारी धनश्री यावेळी नाराज आहे. कारण यावेळी तिच्या जवळच्या व्यक्तिंनी या ट्रोल्समुळे फरक पडला आहे.

सोशल मीडियावर प्रत्येकला बोलण्याची स्वातंत्र्य आहे. पण अनेकजण याच स्वातंत्र्याचा चुकीचा फायदा घेतात. भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावर सक्रिय असते. शनिवारी (16 मार्च) तिने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये फिरकीपटू गोलंदाजाची पत्नी नाराज दिसत आहे. या व्हिडिओत धनश्री ट्रोलर्सवर नाराज दिसत आहे, कारण यावेळी गोष्टी केवळ तिच्यापुरत्या राहिल्या नाहीत. यावेळी गोष्टी तिच्या प्रियजनांपर्यंत पोहोचल्या आहेत.

धनश्री नुकतीच रियालिटी शो ‘झलक दिखला जा 11’मध्ये आली होती. यादरम्यान तिने प्रतीक कोरयोग्राफर उतेकर याच्यासोबत काढलेला एक फोटो व्हायरल झाला. याच कारणास्तव ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. अनेकांनी धनश्री आणि चहलच्या नात्यात सर्वकाही ठीक नसल्याचे बोलले. याच कारणास्तव आता धनश्री नाराज दिसत आहे.

धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून व्हिडिओ पोस्ट केला आहे की, “यावेळी माला या गोष्टींचा परक पडला, कारण माझे कुटुंब आणि प्रियजनांना या गोष्टींनी प्रभावित केले आहे. तुम्हा सर्वांना सोशल मीडियावर आपल्या मनातील गोष्टी बोलण्याचे स्वतंत्र्य आहे. पण त्यामुळे तुम्ही आमच्या आणि आमच्या कुटुंबियांच्या भावना विसरून जाता किंवा त्याकडे दुर्लक्ष करता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) 

युझवेंद्र चहलविषयी बोलायचे झाले, तर इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी तो तयारी करत आहे. राजस्थान रॉयल्ससाठी आगामी आयपीएल हंगामात देखील चहल चेंडूने कमाल दाखवू शकतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम चहलच्या नावावर आहे. त्याने 145 सामन्यांमध्ये 7.66च्या इकोनॉमीने 187 विकेट्स घेतल्या आहेत. यात 6 वेळा चार विकेट्स आणि एक वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम देखील आहे.

महत्वाच्या बातम्या – 
कॅप्टनचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर होणार? डेल स्टेनचं ऐकून तुम्हीही कराव विचार
पालघर संघाची लातूर संघावर मात, पालघर संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---