हार्दिक पंड्या अचानक मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण आघामी हंगामात हाच रोहित हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार आहे. चाहत्यांसाठी हा धक्का होताच, पण संघातील खेळाडूंसाठीही एकप्रकारचा धक्काच होता. फ्रँचायझीच्या या निर्णयाचा परिणाम आगामी हंगामात संघाच्या प्रदर्शनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याला असे वाटत नाही.
डेल स्टेन (Dale Steyn) दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटूंपैकी एक राहिला आहे. त्याने देशासाठी अनेक सामन्यांमध्ये मॅच विनरची भूमिका पार पाडली आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्येही स्टेनचा अनुभव मोठा आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार बनवल्यानंतर चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि काही प्रमाणात नाराजी दिसत आहे. संघातील सहकारी खेळाडूंनाही फ्रँचायझीच्या या निर्णयावर धक्का बसल्याचे बोलले जात आहे. अशात आता आगामी आयपीएल हंगामात हार्दिकच्या नेतृत्वात संघ कसे प्रदर्शन करतो, हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज डेल स्टेन याच्या मते हार्दिकच्या नेतृत्वात खेळण्यासाठी संघ लवकरच रुळेल. कारण संघातील सर्वजण प्रोफेशनल क्रिकेटपटू आहेत.
अशात फ्रँचायझीचा निर्णय संघातील खेळाडूंना मान्य करावा लागले. फ्रँचायझीकडून देखील यासाठी खास कॅम्प राबवण्यात आला असेल, अशी अपेक्षा स्टेनने व्यक्त केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वेगवान गोलंदाज म्हणाला, “त्याने (हार्दिक) मुंबई इंडियन्स सोडली आणि पुन्हा संघात सामील झाला. मला वाटते हे एक आव्हान असेल. मला आशा आहे की, आयपीएलच्या एक महिना आधी फ्रँचायझीचा एखादा कॅम्प झाला असेल. या कॅम्पमुळे संघातील खेळाडूंना असणाऱ्या अडचणी, सामना खेळण्याआधी दूर होतील.”
वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “तुमच्याकडे दिग्गज आहेत. असे लोक आहेत ज्यांनी याआधी महत्वाचे निर्णय घेतले आहेत आणि आता दुसरी जबाबदारी पार पाडत आहेत. हे असे काहीतरी असू शकते, जे आपण टीव्हीवर पाहून किंवा ऐकू शकत नाही. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या या खेळाडूंना माहीत आहे की, आपला अहंकार बाजूला कसा ठेवायचा. मला वाटते मुंबई इंडियन्सला या गोष्टींचा जास्त फरक पडत नाही.”
दरम्यान, मुंबईने आयपीएल 2024च्या लिलिवापूर्वी हार्दिक पंड्याला याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले. हार्दिकने गुजरातची साथ सोडल्यानंतर शुबमन गिल आगामी हंगामात त्यांचा कर्णधार असेल. दुसरीकडे गुजरात मागच्या दोन हंगामात एकदा विजेतेपद, तर एकदा उपविजेतेपद मिळवून देणारा हार्दिक मुंबईचा कर्णधार बनल्यानंतर काय कमाल करतो, हे पाहण्यासारखे असेल.
महत्वाच्या बातम्या –
युवा कबड्डी सिरीज मध्ये नाशिक संघाची सातारा संघावर एकतर्फी मात
पालघर संघाची लातूर संघावर मात, पालघर संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर