पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र पाकिस्तानचं घोडं हे कायम भारतावर येऊन अडतं. तर भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास कायम नकार देत आला आहे. याशिवाय आशिया कपमध्ये देखील भारताच्या या भुमिकेमुळे पाकिस्तानला हाब्रीड पद्धतीने खेळावे लागले होते. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान देखील असं होऊ नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी कंबर कसली आहे.
याबरोबरच, पाकिस्तानात खेळण्यावरून भारत सरकारने विरोध दर्शविल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला त्याविरोधात निर्णय घेण्यास सांगू शकणार नाही. त्यामुळेच गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेदरम्यान समोर आलेला ‘संमिश्र प्रारुप’ या पर्यायाचा पुन्हा विचार केला जाऊ शकतो, असे ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीतील सूत्रांनी सांगितले आहे.
Chairman PCB Mohsin Naqvi with a big statement after attending ICC meeting – "ICC Champions Trophy will be held in Pakistan in February 2025." #ChampionsTrophy #PakistanCricket #CT25 pic.twitter.com/KvItN2DzsG
— King Babar Azam Army (@kingbabararmy) March 15, 2024
अशातच ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्यांची सध्या दुबईत बैठक सुरू आहे. तसेच बैठकीच्या विषय पत्रिकेत हा मुद्दा नसला, तरी यावर चर्चा होऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा आणि ‘आयसीसी’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची असल्याचे सांगितले आहे. तसेच यानंतर, चॅम्पियन्स करंडक आयोजनाच्या एकूण घडामोडींची माहिती घेतल्यास ‘बीसीसीआय’ या संदर्भात कुठलाही निर्णय स्पर्धा जवळ आल्यानंतरच घेण्याची शक्यता आहे.
Attended the ICC board meeting in Dubai.
Insha Allah, the ICC Champions Trophy will be held in Pakistan in February 2025.
Also had a fruitful sideline discussion with Chairman Mr. Roger Twose from NZ Cricket and Chairman Mr. Lawson Naidoo from SA Cricket. Insha Allah a… pic.twitter.com/rjAlBr1St3— Mohsin Naqvi (@MohsinnaqviC42) March 15, 2024
दरम्यान, अलीकडच्या काळात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या सर्व संघांनी पाकिस्तानचा दौरा केला आहेत. तर हे तीनही दौरे यशस्वी झाले याचे दडपण या वेळी ‘बीसीसीआय’वर असू शकेल, असेही काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भारताने पाकिस्तानात खेळण्यावरून दोन्ही देशांतील पदाधिकाऱ्यांकडून होणारी मुत्सद्देगिरी निर्णायक ठरणार आहे.
याच वर्षी भारत-पाकिस्तान डेव्हिस चषक लढत पाकिस्तानात खेळवण्यात पाकिस्तानी संघटकांना यश आले होते. पाकिस्ताननेही एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवला होता. या सगळ्या गोष्टींचा विचार या वेळी करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –