---Advertisement---

IND vs NZ : “तयारीचा अभाव होता का?”, लज्जास्पद पराभवानंतर सचिनने रोहितसेनेला फटकारले

---Advertisement---

मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारताविरुद्ध न्यूझीलंडचा हा ऐतिहासिक विजय ठरला. या पराभवावर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने भारताच्या पराभवाचे कारण सांगितले. त्याने शुबमन गिल आणि रिषभ पंतचेही कौतुक केले आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची तयारी अपूर्ण असल्याचे सचिन म्हणाला.

भारताच्या पराभवाबाबत सचिनने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, ‘घरच्या मालिकेत 0-3 असा पराभव पचवणे सोपे नाही. तयारीचा अभाव होता का? किंवा चुकीच्या फटक्यांची निवड चुकीची होती. गिलने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली होती आणि रिषभ पंत दोन्ही डावात उत्कृष्ट होता. आव्हानात्मक खेळपट्टीवर त्याचे फूटवर्क उत्तम होते. न्यूझीलंड संघाला संपूर्ण श्रेय द्यावे लागेल. त्यांनी संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. भारतात 3-0 हा निकाल सर्वोत्तम आहे.’

न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत भारताचा 8 विकेटने पराभव केला होता. दुसऱ्या कसोटीत त्यांनी 113 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरी कसोटी 25 धावांनी जिंकली.

तिसऱ्या सामन्याचा विचार करायचा झाल्यास भारतीय संघासमोर चौथ्या डावात 148 धावांचे माफक आव्हान होते. मात्र, न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताला तिथपर्यंत पोहोचू दिले नाही. एजाज पटेल याने सर्वाधिक सहा बळी मिळवत भारतीय संघाला पराभूत करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. मालिकेत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विल यंग हा मालिकावीर ठरला.

मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघावर मोठी टीका होत आहे. तब्बल 65 वर्षानंतर भारतीय संघाला मायदेशात क्लीन स्वीप स्वीकारावा लागला. भारत आपली आगामी मालिका ऑस्ट्रेलियात खेळेल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाला 4 सामने जिंकावे लागू शकतात. तरच, भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित आणि विराटने निवृत्त व्हावे; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल
वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग
IND vs NZ; पराभवानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “आम्ही आमचे सर्वोत्तम…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---