भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारतात येऊन भारताला 91 वर्षांनंतर 3-0 असा व्हाॅईटवाॅश दिला. दोन्ही संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने 25 धावांनी मिळवत इतिहास रचला. भारतीय संघाच्या पराभवासह रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर एक लाजिरवाणा रेकाॅर्ड नोंदवला गेला. घरच्या मैदानावर कसोटी मालिका 3-0 ने गमावणारा रोहित भारतीय कर्णधार ठरला आहे.
भारतीय संघाच्या कसोटी इतिहासात घरच्या मैदानावर मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 3 किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला अद्याप घरच्या मैदानावर व्हाईटवॉशचा सामना करावा लागला नव्हता. त्यामुळे हा विजय न्यूझीलंडसाठी ऐतिहासिक ठरला. भारताला कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत करणारा हा चौथा संघ ठरला आहे. याआधी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने ही कामगिरी केली होती.
भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहितने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळू शकलो नाही. कसोटी मालिकेतील पराभव पचवणे सोपे नाही. आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही आणि मला ते मान्य आहे. न्यूझीलंड संघ आमच्यापेक्षा खूप चांगला खेळला. आमच्याकडून या मालिकेत खूप चुका झाल्या.”
भारत-न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 113 धावांनी पराभूत केले. तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव करत 3-0 ने मालिका आपल्या खिशात घातली. टाॅम लॅथमच्या (Tom Latham) नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; भारताचा धुव्वा उडवत न्यूझीलंडने रचला इतिहास…!
पंजाबने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने झळकावले तुफानी शतक!
IND vs NZ; भारतीय संघ अडचणीत असताना रिषभ पंतचे शानदार अर्धशतक!