---Advertisement---

धोनीची नक्कल करणारा भारतीय खेळाडू, फिरकीत हरभजन-वॉर्नसारखी शैली दाखवली

On: शुक्रवार, जुलै 4, 2025 6:21 PM
MS_Dhoni_Test
---Advertisement---

भारत-इंग्लंड (IND vs ENG) मालिकेदरम्यान अनेक भारतीय क्रिकेटपटू काउंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याचं कौशल्य दाखवत आहेत. यामध्ये ईशान किशनच (Ishaan Kishan) ही नाव सामील आहे. तो जरी विकेटकीपर असला तरी सध्या त्यांच्या गोलंदाजीच्या प्रयोगांमुळे तो चर्चेत आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या या हंगामातील पहिल्या दोन डावांत त्याने 87 आणि 77 धावांची खेळी केली आहे.

तसेच विशेष म्हणजे आता त्याने गोलंदाजी केली आणि एका षटकामधील 6 चेंडू सहा वेगळ्या प्रकारच्या गोलंदाजी शैलींनी टाकले. सोमरसेटविरुद्ध सामन्यात ईशान किशन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने षटकाचा पहिला चेंडू हरभजन सिंगसारख्या (Harbhajan Singh) अ‍ॅक्शनमध्ये टाकला, तर नंतर महान फिरकीपटू शेन वॉर्नची नक्कल करत फिरकी गोलंदाजी देखील केली.

या सामन्यात किशन (Ishaan Kishan) आधी विकेटकीपिंग करत होता. पण डावाच्या मधोमध त्याने ग्लोव्हज दुसऱ्या खेळाडूला दिले आणि स्वतः हातात चेंडू घेतला. ईशान किशनने हे करताच चाहत्यांना एमएस धोनीची (MS dhoni) आठवण झाली. धोनीनेही 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका सामन्यात थोडा वेळ विकेटकीपिंग सोडून गोलंदाजी केली होती.

ईशान किशनला गेल्या वर्षी बीसीसीआयने (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीतून बाहेर केले होते. पण 2025-26 हंगामासाठी त्याला पुन्हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीत घेण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. मात्र आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याने जोरदार कामगिरी करत भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी तो स्वतःला सिद्ध करत आहे.

ईशान किशन शेवटचा नोव्हेंबर 2023 मध्ये टीम इंडियासाठी (Team india) खेळताना दिसला होता. त्याने आत्तापर्यंत 27 वनडे सामन्यांत 933 धावा, 32 टी-20 सामन्यांत 796 धावा आणि 2 कसोटी सामन्यांत 78 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एक शतक आणि 13 अर्धशतकं झळकावली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---