---Advertisement---

रोहित आणि विराटने निवृत्त व्हावे; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल

---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मायदेशात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 3-0 ने क्लीन स्वीप केला आहे. तिसरी कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच (3 नोव्हेंबर) पाहुण्या न्यूझीलंड संघाने भारताचा 25 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय चाहते रोहित आणि विराट कोहलीच्या निवृत्तीची मागणी करत आहेत.

भारताला सामना जिंकण्यासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ 121 धावाच करू शकला. या विजयासह न्यूझीलंड संघाने कसोटी मालिका 3-0 अशी खिशात घातली. न्यूझीलंडच्या विजयाचा नायक ठरला डाव्या हाताचा फिरकीपटू एजाज पटेल, ज्याने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. एजाजने पहिल्या डावातही 5 विकेट्स घेतल्या होत्या.

चाहत्यांनी भारतीय संघाला जोरदार ट्रोल केले
या सामन्यात  न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 263 धावा केल्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला 28 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला 147 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने या सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत शुबमन गिल आणि रिषभ पंत यांनी योगदान दिले.

मात्र अनुभवी फलंदाज रोहित आणि विराट दोन्हीही डावात सपशेल फ्लॉप ठरले. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाला जोरदार ट्रोल केले. यामध्ये कर्णधार रोहित आणि विराट हे चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. चाहते प्रचंड संतापले असून बहुतेकांनी रोहित आणि विराटला निवृत्तीचा सल्लाही दिला आहे.

दोघांना 6 डावात 100 धावाही करता आल्या नाहीत
एका यूजरने लिहिले की, ‘विराट आणि रोहित यांनी निवृत्ती घ्यावी अशी आमची इच्छा आहे.’ आणखी एका युजरनेही चाहत्यांना हाच प्रश्न विचारला, ‘कोहली-रोहितने निवृत्ती घ्यावी का?’ या मालिकेत रोहितने 6 डावात केवळ 91 धावा केल्या आहेत. तर विराटने 93 धावा केल्या. एकूण 6 डावात मिळूनही दोघांना धावांचे शतकही करता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग

IND vs NZ; पराभवानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “आम्ही आमचे सर्वोत्तम…”
IND vs NZ; भारताचा धुव्वा उडवत न्यूझीलंडने रचला इतिहास…!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---