---Advertisement---

एका यॉर्करनं बदललं ‘या’ 17 वर्षाच्या गोलंदाजाचं आयुष्य, खुद्द धोनीही झाला फॅन!

---Advertisement---

कोणत्याही खेळात यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीबरोबरच नशिबाचीही साथ असणं आवश्यक असतं. अनेक खेळाडूंकडे गुणवत्ता असूनही योग्य वेळी संधी न मिळाल्यानं ते मागे राहतात. मात्र श्रीलंकेच्या एका 17 वर्षीय युवा गोलंदाजाच्या नशिबानं त्याला साथ दिली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं स्थान शोधत असलेल्या या गोलंदाजाच्या एका यॉर्कर चेंडूनं त्याच्या कारकिर्दीला नवं वळण मिळालं.

या 17 वर्षीय गोलंदाजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की खुद्द एमएस धोनीनं त्याची दखल घेतली. माहीनं या युवा गोलंदाजाला श्रीलंकेतून भारतात बोलावल असून आता तो चेन्नई सुपर किंग्जच्या नेटमध्ये गोलंदाजी करणार आहे. महेंद्रसिंह धोनी या 17 वर्षांच्या गोलंदाजाचा फॅन झाला आहे.

श्रीलंकेच्या या युवा वेगवान गोलंदाजाचं नाव आहे कुगादास मथुलान. कुलादासचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यानं त्याच्या घातक यॉर्करनं फलंदाजाला चारी मुंड्या चित केलं होतं. कुगादासच्या हातातून बाहेर पडलेला चेंडू इतका धारदार होता की त्यामुळे फलंदाजाचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. खुद्द एमएस धोनीलाही कुगादासचा हा चेंडू आवडला. त्यामुळे त्यानं त्याला श्रीलंकेतून भारतात बोलावून घेतलं. आता तो चेन्नई सुपर किंग्ज संघात नेट गोलंदाज म्हणून आपली प्रतिभा दाखवणार आहे.

 

कुगादासची खास गोष्ट म्हणजे त्याची ॲक्शन हुबेहुब लसिथ मलिंगासारखी आहे. त्याचा ज्या चेंडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, लसिथ मलिंगा देखील त्याच्या कारकिर्दीत अशाच प्रकारे चेंडू फेकायचा.

कुगादास मथुलान आता एमएस धोनीच्या देखरेखीखाली त्याच्या गोलंदाजीवर काम करेल. जर तो धोनीला नेट बॉलर म्हणून प्रभावित करण्यात यशस्वी ठरला तर श्रीलंकेच्या या युवा गोलंदाजाला चेन्नई सुपर किंग्ज संघातही प्रवेश मिळू शकतो. माहीची खास गोष्ट म्हणजे युवा खेळाडूंमध्ये दडलेली प्रतिभा कशी ओळखायची हे त्याला चांगलं माहीत आहे.

महत्त्वाची बातमी-

IPL 2024 : हार्दिक पांड्याला पुन्हा दुखापत? अन् मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ

IPL 2024 : मुंबईनं लिलावात 9 कोटींना खरेदी केलेला खेळाडू आरसीबीत जाणार?

मुंबईविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर स्मृती मानधना भावूक, मैदानावर अश्रू आवरले नाहीत; पाहा व्हिडिओ

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---