आयपीएलच्या 17व्या हंगामापूर्वी अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात टी20 मालिकेला शुक्रवारपासून (15 मार्च) सुरुवात झाली आहे. तसेच शारजहा येथे झालेल्या सामन्यात आयर्लंड संघाने 38 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 षटकांत 9 बाद 149 धावा केल्या होत्या. यानंतर अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 18.4 षटकांत 111 धावांवर ऑलआऊट झाला आहे.
याबरोबरच याच सामन्यात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने एक मोठा विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 27 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 400 चौकारांचा टप्पा पार केला. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 400 चौकार मारणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
अशातच स्टर्लिंगच्या नावावर आता 135 टी20 सामन्यात 401 चौकार झाले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत स्टर्लिंगपाठोपाठ बाबर आझम आहे. त्याने 109 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 395 चौकार मारले आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने 361 चौकार मारले आहेत, तर चौथ्या क्रमांकावर असेलल्या रोहित शर्माने 359 चौकार मारले आहेत.
https://twitter.com/ICC/status/1768683627125059764
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे क्रिकेटपटू पुढीलप्रमाणे –
पॉल स्टर्लिंग – 401 चौकार (135 सामने)
बाबर आझम – 395 चौकार (109 सामने)
विराट कोहली – 361 चौकार (117 सामने)
रोहित शर्मा – 359 चौकार (151 सामने)
डेव्हिड वॉर्नर – 320 चौकार (103 सामने)
महत्वाच्या बातम्या –