आयसीसीनं नुकतीच ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय खेळाडूंचं वर्चस्व दिसून आलं आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पहिल्या स्थानावर झेप घेतली. बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये बुमराहनं उत्कृष्ट कामगिरी केली होती, ज्याचा त्याला फायदा झाला आहे. कानपूर कसोटीत बुमराहनं 6 विकेट घेतल्या होत्या. भारताच्या धमाकेदार विजयात त्याचं मोठं योगदान होतं.
जसप्रीत बुमराहनं भारताचा स्टार ऑफस्पिनर आर अश्विनला मागे टाकलं. अश्विनची आता दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. अश्विननं बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एकूण पाच विकेट घेतल्या होत्या. तो बुमराहच्या 870 रेटिंग गुणांपेक्षा फक्त एक गुण मागे आहे. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्याला टॉप-10 गोलंदाजांच्या यादीत एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता 8व्या स्थानावर पोहोचला आहे. ही त्याच्या कारकिर्दीची सर्वोच्च रँकिंग आहे.
भारताचा रवींद्र जडेजा 6व्या स्थानावर कायम आहे. टॉप 10 मध्ये बुमराह, अश्विन आणि जडेजा हे तीन भारतीय गोलंदाज आहेत. कुलदीप यादव 16 व्या स्थानी आहे. या चौघांशिवाय टॉप 20 मध्ये अन्य भारतीय गोलंदाज नाही.
बांगलादेशच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, मेहंदी हसन 4 स्थानांची झेप घेऊन 18 व्या स्थानावर तर शाकिब अल हसन 5 स्थानांची झेप घेऊन 28 व्या स्थानावर पोहोचला. बुमराहचे रेटिंग गुण 870 असून अश्विन 869 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत टॉप 5 मध्ये भारताचे दोन, ऑस्ट्रेलियाचे दोन आणि दक्षिण आफ्रिकेचा एक गोलंदाज आहे.
कसोटीतील टॉप 5 गोलंदाज
(1) जसप्रीत बुमराह – 870 रेटिंग गुण
(2) आर अश्विन- 869 रेटिंग गुण
(3) जोश हेझलवूड- 847 रेटिंग गुण
(4) पॅट कमिन्स- 820 रेटिंग गुण
(5) कागिसो रबाडा- 820 रेटिंग गुण
हेही वाचा –
रोहित शर्माच्या या ‘मास्टरप्लॅन’मुळे बांगलादेशचा पराभव, अश्विननं उघड केलं रहस्य
बांगलादेशविरुद्ध संधी मिळाली नाही, मुंबईच्या फलंदाजानं इराणी चषकात शतक ठोकून दिलं निवडकर्त्यांना उत्तर!
हत्येचा गुन्हा असलेला शाकिब बांगलादेशात परतणार नाही? या देशात स्थायिक होण्याची शक्यता