---Advertisement---

टीम इंडियाला धक्का! पुनरागमन करण्यापूर्वी स्टार खेळाडू पुन्हा जखमी

---Advertisement---

भारतीय चाहते वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याला लवकरात लवकर क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. पण आता या दरम्यान शमीच्याबाबतीत मोठी बातमी समोर येत आहे. जे की चाहत्यांना अस्वस्थ करणारी आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी रिक्वहर करत असलेल्या शमीला पुन्हा दुखापत झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

शमी टाचांच्या शस्त्रक्रियेतून परत येऊ शकला नव्हता. आता दुसऱ्या दुखापतीने त्याला पुन्हा मागे टाकले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात शमीच्या दुखापतीबाबत खुलासा करताना पुनर्वसन करणाऱ्या शमीच्या गुडघ्यात एनसीएमध्ये सूज आली आहे. तो आणखी 6-8 आठवडे संघा बाहेर राहू शकतो. असे म्हटले आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, “शमीने गोलंदाजी सुरू केली होती आणि तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याच्या मार्गावर होता. परंतु अलीकडेच त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो पुन्हा तंदुरुस्त परतण्यसाठी थोडा वेळ लागेल.”

नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी शमी पुन्हा मैदानात उतरेल. अशी अपेक्षा होती. भारतीय वेगवान गोलंदाजाने नोव्हेंबर 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये शेवटचा सामना खेळला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर शमीच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

शमी जो भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत त्याने 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शमीने कसोटीच्या 122 डावांमध्ये 27.71 च्या सरासरीने 229 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 100 डावांमध्ये 23.68 च्या सरासरीने 195 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 च्या उर्वरित 23 डावांमध्ये त्याने 29.62 च्या सरासरीने 24 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा-

‘थाला’ची क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याचा 1200 कि.मी सायकल प्रवास
IND vs BAN: सामनावीर कोण ठरला, मालिकावीर ट्रॉफी कोणाला मिळाली?
IND VS NZ; कसोटी मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---