IPLक्रिकेटटॉप बातम्या

आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सहभागावर हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघा एक आठवडा बाकी आहे. येत्या 22 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आमनेसामने असतील.

दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं एका पाकिस्तानी चाहत्याला दिलेलं उत्तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पाकिस्तानी चाहत्यानं सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमध्ये बाबर आझम आणि विराट कोहली, मोहम्मद रिझवान आणि महेंद्रसिंह धोनी व शाहीन आफ्रिदी आणि जसप्रीत बुमराह यांचे फोटो शेअर केले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं – “या खेळाडूंनी आयपीएलमध्ये सोबत खेळणं हे अनेक भारतीय आणि पाकिस्तानींचं स्वप्न आहे.”

या पोस्टवर हरभजन सिंगनं अतिशय मजेशीर उत्तर दिलं. भारताच्या या माजी फिरकीपटूनं लिहिलं की, “कोणत्याही भारतीयाचं असं स्वप्न नाही. तुम्ही लोक अशी स्वप्नं पाहणं बंद करा… झोपेतून जागे व्हा.” हरभजन सिंगचं हे उत्तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्स यावर सातत्यानं कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

असं नाही की आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळलेला नाही. इंडियन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. या हंगामात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, कामरान अकमल आणि सलमान बट यांच्यासह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळले होते. परंतु 26 नोव्हेबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली. तेव्हापासून एकही पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळलेला नाही.

आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान असेल. चेन्नईच्या एम.चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. मात्र आयपीएल 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाऊ शकतो. यावर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हा निर्णय घेऊ शकतं. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

एका यॉर्करनं बदललं ‘या’ 17 वर्षाच्या गोलंदाजाचं आयुष्य, खुद्द धोनीही झाला फॅन!

IPL 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाईल? लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआय निर्णय घेण्याची शक्यता

महेंद्रसिंंह धोनीनंतर कोण होणार चेन्नईचा पुढील कर्णधार? ‘हे’ खेळाडू आहे शर्यतीत

Related Articles