पुणे (16 मार्च 2024) – आजचा तिसरा सामना सांगली विरुद्ध धाराशिव या संघांच्यात झाला. सांगली ने आता पर्यत तीन विजय मिळवले होते. तर धाराशिव संघ अजून आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत होता. दोन्ही संघांनी संथ करून नंतर मात्र सांगली संघाने आक्रमक सुरुवात करत केली. पहिल्या पाच मिनिटांच्या खेळात सांगली कडे 4-2 अशी आघाडी होती त्यानंतर मात्र 9 व्या मिनिटाला धाराशिव संघाला ऑल आऊट सांगली संघांने 12-04 अशी आघाडी मिळवली.
सांगलीच्या अभिराज पवार सुपर टेन पूर्ण करत सामन्यावर आपली छाप पाडली होती. सांगली ने मध्यंतरापूर्वी पुन्हा एकदा धाराशिव संघाला ऑल आऊट करत 24-08 अशी आघाडी मिळवली होती. मध्यांतरा नंतर असाच खेळ कायम ठेवत धाराशीव संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत सांगली ने सामन्यावर पूर्णपणे पकड घेतली. तुषार खडके सुद्धा चपळाई चढाया गुण मिळवले.
सांगली संघाने 61-18 असा एकतर्फी विजय मिळवत गुणतालिकेत पहिला स्थानावर झेप घेतली. संपूर्ण सामन्यात 6 बोनस गुणांसह एकूण 16 गुण मिळवले. तुषार खडके ने चढाईत 7 गुण मिळवले. तर प्रणव माने ने पकडीत 5 गुण मिळवले. तर नवाज देसाई ने 3 व प्रसन्ना पाटील ने 4 पकडीत गुण मिळवले. वृषभ साळुंखे ने अष्टपैलू खेळ केला. धाराशिव कडून दीपक राठोड ने सर्वाधिक 7 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अभिराज पवार, सांगली
बेस्ट डिफेंडर- प्रणव माने, सांगली
कबड्डी का कमाल – वृषभ साळुंखे, सांगली
महत्वाच्या बातम्या –
‘थाला’ची बॅट दोन वर्षांपासून शांतच! धोनीनं आयपीएलमध्ये शेवटचं अर्धशतक कधी झळकावलं होतं?
केकेआरमध्ये पुन्हा येण्यासाठी शाहरुखकडून मिळाला कोरा चेक? वाचा गौतम गंभीरने का सोडली लखनऊची साथ