पुणे (16 मार्च 2024) – आजचा दुसरा सामना कोल्हापूर विरुद्ध नंदुरबार यांच्यात झाला. नंदुरबार संघ 4 विजयासह पहिल्या क्रमांकावर होता तर कोल्हापूर संघ तीन विजयासह चौथ्या स्थानावर होता. दोन्ही संघानी सामनाच्या सुरुवातीला सावध खेळ केला. सौरभ फगारे व ओमकार पाटील यांनी चतुरस्त्र चढाया करत आघाडी मिळवली. सामन्याच्या 10 व्या मिनिटाला कोल्हापूर संघाने नंदुरबार संघाला ऑल आऊट करत 11-04 अशी आघाडी मिळवली होती.
मध्यंतरापूर्वी उर्वरित 10 मिनिटाच्या खेळात कोल्हापूर ने पुन्हा एकदा नंदुरबार संघाला ऑल आऊट करत आपली 25-06 अशी आघाडी मिळवली. सौरभ फगारे व ओमकार पाटील ने चढाईत आपली जबाबदारी चोख निभावली तर कर्णधार दादासो पुजारीने बचावात उत्कृष्ट खेळ दाखवला. कोल्हापूर संघाने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत सामना एकतर्फी केला.
सौरभ फगारे व ओमकार पाटील यांनी सुपर टेन पूर्ण केला. सौरभ फगारे ने सर्वाधिक 13 गुण मिळवले तर ओमकार पाटील ने चढाईत 11 गुण मिळवले. कोल्हापूर संघाने सामना 52-14 असा जिंकत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. दादासो पुजारी ने पकडीत 5 गुण तर धनंजय भोसले ने पकडत 4 गुण मिळवले. तर साईप्रसाद पाटील पकडीत 3 गुण व वैभव राबाडे ने पकडीत 2 गुण मिळवले. (Kolhapur team stopped Nandurbar team’s winning chariot)
बेस्ट रेडर- सौरभ फगारे, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- दादासो पुजारी, कोल्हापूर
कबड्डी का कमाल – ओमकार पाटील, कोल्हापूर
महत्वाच्या बातम्या –
‘थाला’ची बॅट दोन वर्षांपासून शांतच! धोनीनं आयपीएलमध्ये शेवटचं अर्धशतक कधी झळकावलं होतं?
केकेआरमध्ये पुन्हा येण्यासाठी शाहरुखकडून मिळाला कोरा चेक? वाचा गौतम गंभीरने का सोडली लखनऊची साथ