इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामा सुरु व्हायरला अवघ्या काही दिवसांचा वेळ बाकी आहे. सर्व संघ या सर्वात मोठ्या टी-20 लीगसाठी तयारी करत आहे. चाहत्यांचा लाडका युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत देखील मैदानात पुनरागमन करणार आहे. त्यासाठी पंत सराव सत्रात मेहनत घेत आहे. नुकताच त्याचा सराव सत्रातील व्हिडिओ समोर आला आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. पण दुखापतीमुळे मागच्या 14 महिन्यांमध्ये तो राष्ट्रीय संघाला सेवा पुरवू शकला नाही. त्याच्या अनुपस्थिती संघात अनेकदा भासली. खासकरून कसोटी फॉरमॅटमध्ये पंत संघात हवा होता. असे असले तरी, येत्या काळात तो लवकरच पुन्हा एकदा भारताच्या कसोटी जर्सीत देखील दिसेल. आयपीएल 2024 हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी होणार आहे. रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स संघ हंगामातील पहिला सामना 23 मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध खेळेल. पंतसाठी हा पुनरागमनाचा सामना महत्वाचा असेल. त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
तत्पूर्वी पंतने आपल्या अधिकृत ‘X’ खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओत पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये घाम गाळत आहे. यादरम्यान त्याने अनेक आकर्षक आणि मोठे शॉट्स मारले आहेत. पंत नेट्समध्ये फलंदाजी करताना चांगल्या लयीत दिसत आहे. त्याची फलंदाजी पाहून आगामी आयपीएल हंगाम तो बॅटने गाजवणार, असे वाटत आहे. फलंदाजीसह पंतने विकेटकीपिंगचाही सराव केला. पंतचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीला पडत आहे. चाहते त्याला लवकरात लवकर आयपीएलमध्ये खेळताना पाहू इच्छित आहेत.
🔙 to the game I love the most 🫶#RP17 #DelhiCapitals pic.twitter.com/yVtEwhLtZy
— Rishabh Pant (@RishabhPant17) March 16, 2024
दरम्यान, पंत एवढे दिवस मैदानातून बाहेर राहण्याचे कारण 30 डिसेंबर 2022 रोजी झालेला कार अपघात आहे. दिल्लीहून आपल्या घरी म्हणजे रुरकीला जाताना पंतच्या गाडीचा अपघात झाला. अपघात एवढा गंभीर होता की, गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने पंत आधीच गाडीच्या बाहेर पडला होता. असे असले तरी, त्याला झालेली दुखापत गंभीर होती. अनेकद जागी फ्रँक्चर असल्याने यष्टीरक्षक फलंदाजाला यातून सावरण्यासाठी 14 महिन्यांचा वेळ लागला. नुकतीच त्याला बीसीसीआयकडून खेळण्याची परवानगी देखील मिळाली आहे. (Rishabh Pant playing big shots in Delhi Capitals’ practice session after recovering from injury)
महत्वाच्या बातम्या –
पालघर संघाची लातूर संघावर मात, पालघर संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर
कॅप्टनचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर होणार? डेल स्टेनचं ऐकून तुम्हीही कराव विचार