7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी (ICC T20 international world cup 2026) पाकिस्तानने भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या या ‘अतरंगी’ निर्णयामुळे क्रिकेट विश्वाचे किती मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, याचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यातून अंदाजे 25 कोटी डॉलर्स (सुमारे 2200 कोटी रुपये) इतका महसूल मिळतो. सामना रद्द झाल्यास या सर्व रकमेवर पाणी सोडावे लागेल. भारत-पाक सामन्यात केवळ 10 सेकंदांच्या जाहिरातीची किंमत 40 लाख रुपये असते. सामना न झाल्यास प्रसारकांना (Broadcasters) 200 ते 250 कोटी रुपयांच्या जाहिरातींचे नुकसान होईल.
जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिला, तर त्याचे परिणाम त्यांच्यासाठी भयानक असतील. सामना न खेळल्यास भारताला आपोआप विजयी घोषित करून पूर्ण गुण दिले जातील. नियमांनुसार आयसीसी (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) मोठा आर्थिक दंड लावू शकते. पाकिस्तानचे वार्षिक उत्पन्न साधारण 3.55 कोटी डॉलर्स आहे.
जर आयसीसीने मोठा दंड ठोठावला, तर पाकिस्तानचे क्रिकेट पूर्णपणे उद्ध्वस्त (बर्बाद) होऊ शकते. भारत-पाकिस्तान सामने फक्त मोठ्या स्पर्धांमध्येच (उदा. वर्ल्ड कप) होतात. त्यामुळेच आयसीसी मुद्दाम या दोन संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवते. प्रसारक संस्था ‘जिओ-स्टार’ (JioStar) आधीच त्यांच्या कराराबद्दल आयसीसीशी चर्चा करत आहे, अशात या मोठ्या सामन्याचे नुकसान त्यांना परवडणारे नाही.






