---Advertisement---

38 वर्षीय अमेरिकन गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजी ढेपाळली; पॉवरप्ले मध्येच ईशान, तिलकसह स्टार खेळाडू फेल!

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 8:31 PM
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) चा दिमाखात आगाज झाला असून 7 फेब्रुवारी रोजी भारत आणि अमेरिका (India vs USA) यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात अमेरिकेच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये अतिशय घातक गोलंदाजी केली. विशेषतः 38 वर्षाचा गोलंदाज शेडली वैन शाल्कविकने अप्रतिम प्रदर्शन करत पॉवरप्लेमध्ये भारतीय फलंदाजांची अक्षरशः हवा काढून टाकली.

38 वर्षांच्या शेडली वैन शाल्कविकने पॉवरप्लेमध्ये कहर केला असून त्याने सहाव्या ओव्हरमध्ये भारताच्या तीन स्टार खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर (5.2षटकं) ईशान किशनला बाद केले, त्यानंतर पाचव्या चेंडूवर (5.5 षटक) तिलक वर्माला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. इतकेच नाही तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यांनी शिवम दुबेला देखील बाद केले. अशा प्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले.

शेडली वैन शाल्कविकने आपल्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना पूर्णपणे धक्का दिला, ज्यामुळे भारताने 6 षटकांमध्ये आपले 4 महत्त्वाचे विकेट गमावले.

या सामन्यात भारताचे सगळेच मोठे स्टार फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. अभिषेक शर्माच्या रूपाने भारताला पहिला मोठा झटका बसला, तो एकही धाव न काढता ‘गोल्डन डक’वर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन 16 चेंडूत 20 धावा बनवून माघारी परतला. तिलक वर्माने 16 चेंडूत 25 धावा केल्या, ज्यात त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. याशिवाय शिवम दुबेच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला. त्यानंतर रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्या सुद्धा पाठोपाठ अपयशी ठरले. आता कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर चांगली धावसंख्या उभारण्याची जबाबदारी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---